वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Naresh Goyal मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला. गोयल यांनी वैद्यकीय आणि मानवतावादी कारणे सांगून जामीन मागितला होता. नरेश कर्करोगाने त्रस्त असून त्यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.Naresh Goyal
नरेश यांना 1 सप्टेंबर 2023 रोजी अटक करण्यात आली होती. या वर्षी मे महिन्यातही नरेश गोयल यांना कर्करोगाच्या उपचारासाठी दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला होता. नरेश मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात बंद आहेत. नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचे 16 मे रोजी मुंबईत निधन झाले. त्या दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होत्या.
काय आहे जेट एअरवेजचे प्रकरण
गोयल यांनी 1993 मध्ये जेट एअरवेजची स्थापना केली. 26 वर्षांनंतर, आर्थिक कारणांमुळे एप्रिल 2019 मध्ये एअरलाइन बंद झाली. गोयल यांनी मे 2019 मध्ये अध्यक्षपद सोडले.
त्यावेळी जेट एअरवेजकडे कॅनरा बँकेचे 538.62 कोटी रुपयांचे कर्ज होते. जेट एअरवेजने क्रेडिट लिमिट आणि 848.86 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.
तीन वर्षांनंतर, 2021 मध्ये, कॅनरा बँकेने आरोप केला होता की जेट एअरवेजच्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये असे आढळून आले की जेटने त्याच्या संबंधित कंपन्यांना 1,410.41 कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. कंपनीच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी हा प्रकार करण्यात आला.
गोयल कुटुंबावर कर्मचाऱ्यांचे पगार, फोन बिल आणि वाहन खर्च यासारखे वैयक्तिक खर्च फक्त जेट एअरवेजच्या खात्यातून भरल्याचा आरोप होता.
जेट एअरवेज एप्रिल 2019 पासून बंद आहे
जेट एअरवेज ही एकेकाळी भारतातील सर्वात मोठी खाजगी विमानसेवा होती आणि दक्षिण आशियाई देशांमधील सर्वात मोठ्या खाजगी विमान कंपनीचा दर्जा होता. त्यानंतर, कर्जाच्या ओझ्यामुळे, जेट एअरवेज 17 एप्रिल 2019 रोजी ग्राउंड (ऑपरेशन बंद) करण्यात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App