विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागलीय तसे आता अनेकांचे खरे चेहरे समाेर येऊ लागले आहेत. मराठा आंदाेलक मनाेज जरांगे- पाटील महायुती आणि महाविकास आघाडीला समान अंतरावर ठेवल्याचे भासवित हाेते. मात्र, आता ते महाविकास आघाडीची भाषा बाेलू लागले आहेत. लाडकी बहिण याेजनेवरून त्यांनी महायुतीवर हल्ला चढविला आहे. Manoj Jarange with Mahavikas Aghadi
मनाेज जरांगे म्हणाले, तुम्ही शेतकऱ्यांना काय दिलं. ओबीसी, दलित, मराठ्यांना काय दिलं. ७५ वर्षापूर्वी विजेचा पोल टाकला. तो अजूनही तसाच आहे. तोही बदलला नाही. साधी कर्जमुक्तीही केली नाही. एक रुपयांचा पीक विमा गेला कुठे. हप्ते न भरल्याने पीक विमा देऊ शकत नाही असं कंपन्या म्हणतात.
लाडकी बहीण योजनेचे नाव न घेता सरकारवर टीका करताना जरांगे पाटील म्हणाले, तुम्ही १५०० रुपये देऊन नादी लावत आहत का? आता परिवर्तन होणार. सहन करण्याची क्षमता संपली. सुपडा साफ करणार म्हणजे करणार. सोडणार नाही. चिन्ह मिळाल्यावर आम्ही बोलू.
शेतकऱ्यांचं वाटोळं केलं. मराठा, धनगर आणि ओबीसींचं वाटोळं केलं. विरोधक नव्हते तरीही त्यांनी आमच्यावर त्यांनी वार करायला नको होतं. हिन वागणूक द्यायला नको होती. आमच्या जनतेला त्रास दिला म्हणून हा उठाव झाला. आम्ही जागांच्या लफड्यात पडणार नाही. आम्ही लोकशाही मार्गाने जाणार आहोत. आम्ही कुणाला दादागिरी करणार नाही.
तुम्ही उभं राहतं तसं आम्ही उभं राहणार नाही. कोण उभा राहील कोण नाही हे आम्ही ठरवणार. आचारसंहितेचे नियम पाळून काम करायचं आहे. गरीब माणूस उभा राहत असेल तर त्याला रोखू नका. तुम्ही मतदारांपर्यंत जा. आम्ही जाणार आहोत. धमकावू नका. ३ तारखेला आम्ही उमेदवार आणि मतदारसंघ सांगणार आहोत. ४ तारखेला अर्ज मागे घेण्यात येईल. ज्यांना अर्ज मागे घ्या सांगितलं तर त्यांनी अर्ज मागे घ्यायचा. एकच उमेदवार राहील. बाकींच्यांनी स्टार प्रचारक म्हणून काम करायचं आहे, असे आवाहन जरांगे- पाटील यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App