विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवारांनी “ताटातलं वाटीत” करत अजितदादांच्याच राष्ट्रवादीची फोडाफोडी करून आपल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची भरती केली. बाकीच्या पक्षातला एखाद दुसराच नेता पवारांकडे गेला. त्या पलीकडे पवारांना इतर पक्षांची फोडाफोडी करता आली नाही. पण अजितदादांची राष्ट्रवादी फोडून पवार आपल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा 87 आकडा गाठू शकले. त्या उलट महाराष्ट्रात भाजप कमळ चिन्हावर 148 जागा लढवत असला तरी मित्र पक्षांना उमेदवार पुरवठ्यात भाजपने पवारांवर देखील मात केली आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12 आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीला 5 उमेदवारांचा पुरवठा केला आहे.
भाजपचे 12 नेते शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार
माजी केंद्रीय मंत्री नाराणय राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करुन निवडणुकीला सामोरे जात आहेत. शिंदेंच्या शिवसेनेने निलेश राणे यांना कुडाळ-मालवणमधून उमेदवारी दिली आहे.
भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्या कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
भाजप नेते राजेंद्र गावीत हे देखील शिंदेंच्या सेनेत दाखल झाले असून ते पालघर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
विलास तरे यांनी देखील विधानसभेसाठी शड्डू ठोकलाय. यापूर्वी ते भाजपमध्ये होते. आता त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत बोईसरमधून विधानसभा लढण्याचा निर्णय घेतलाय.
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेंनी संतोष शेट्टी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी देखील काही दिवसांपूर्वी भाजपमधून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Election Commission निवडणूक आयोगाने EVMबाबत काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले ; प्रत्येक आक्षेपाला उत्तरे दिली
अंधेरीतील दिग्गज नेते मुरजी पटेल भाजपमध्ये अनेक वर्ष काम करत होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.
अमोल खताळ संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. संगमनेरमधून निवडणूक लढण्यास सुजय विखे आग्रही होते. मात्र, ऐनवेळी त्यांचं तिकीट कापण्यात आले. अमोल खताळ यांनी देखील भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केला.
शायना एन सी या देखील भाजपमध्ये होत्या. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना मुंबादेवीमधून निवडणूक लढणार आहेत.
अजित पिंगळे यांनी भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केला, त्यांना धाराशिवमधून उमेदवारी देण्यात आली.
करमाळा विधानसभा मतदारसंघात दिग्वीजय बागल यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी जवळपास 6 महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
नेवासामध्ये विठ्ठल लंके यांना नेवासामधून शिंदेंनी उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी ते देखील भाजपमध्ये कार्यरत होते.
बळीराम शिरसकर यांना ठाकरेंच्या नितीन देशमुख यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी बळीराम शिरसकर भाजपमध्ये होते.
भाजपच्या नेत्यांना अजित पवारांचे तिकीट
1. राजकुमार बडोले 2. प्रताप पाटील चिखलीकर 3. निशिकांत पाटील 4. संजय काका पाटील
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App