विशेष प्रतिनिधी
नाशिक : काँग्रेसी संस्कृतीतल्या नेत्यांचे वैरं तिसऱ्या पिढीत झिरपले, पण एका अश्लाघ्य वक्तव्यातून ते भाजपला बाधले असेच म्हणायची वेळ संगमनेर मधल्या वादातून आली आहे. नगर जिल्ह्यात विखे विरुद्ध थोरात हा वाद काही नवा नाही. तो तीन पिढ्या चालत आलाय. त्यांनी एकमेकांवर चिखलफेक करणे हे देखील नवीन नाही. ते देखील पिढ्यानपिढ्या चालत आले. पण काही झाले, तरी हे वाद केवळ एकमेकांनाच राजकीय दृष्ट्या बाधत होते. पण आता तिसऱ्या पिढीत झिरपरलेला वाद भाजपला बाधला आहे.
विखे आणि थोरात हे दोघेही काँग्रेसी संस्कृतीतले नेते. पण विखे भाजपमध्ये आले मंत्री झाले. आता त्यांच्या पुढच्या पिढीची सोय लावण्यासाठी संगमनेरात घुसले. ते थोरात यांना आवडले नाही म्हणून तो वाद सुजय विखे विरुद्ध जयश्री थोरात असा रंगला, पण त्यामध्ये भाजपचे वरिष्ठ नेते वसंत देशमुख हे जयश्री थोरातांविषयी असभ्य उद्गार काढून बसले. त्यामुळे संगमनेर पेटले. सुजय विखे यांची राजकीय सोय लावण्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होण्यापेक्षा प्रतिकूलच वातावरण निर्मिती झाली. वसंत देशमुख यांना भाजपमध्ये ठेवणार नाही, अशी प्रतिक्रिया सुजय विखे यांना व्यक्त करावी लागली. जयश्री थोरात यांच्या पॉलिटिकल लॉन्चिंगची संधी काँग्रेसला आणि विशेषतः बाळासाहेब थोरात यांना मिळाली, ती त्यांनी पुरेपूर उचलली.
Congress काँग्रेसच्या यादीत राहुल गांधींनी घातले लक्ष, 100 पेक्षा कमी नाहीच, ठरवले लक्ष्य!!
पण या सगळ्यांमध्ये भाजपची प्रतिमा मलीन करण्याची संधी काँग्रेसला आणि काँग्रेसनिष्ठ प्रसार माध्यमांना मिळाली. वास्तविक विखे आणि थोरात हे काँग्रेसी संस्कृतीमध्ये नेते. त्यांचे राजकीय वैर देखील काँग्रेसी संस्कृतीला बसणारे. पण विखे भाजपमध्ये आले. तिथून मंत्री झाले. मुलाची सोय लावण्यासाठी संगमनेरात घुसले. पण तिथे एका अश्लाघ्य वक्तव्याने सगळा विचका झाला. लाडकी बहीण योजनेवरून जी वातावरण निर्मिती संपूर्ण महाराष्ट्रात झाली, तिला गालबोट लागण्याचा प्रकार घडला. आता त्याचे परिणाम कुठपर्यंत जातील??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App