विशेष प्रतिनिधी
पुणे : Maharashtra परिवर्तन महाशक्ती असे नाव घेतलेल्या परिवर्तन महाशक्तीची उडी 150 जागांवरच अडली, आघाडीचे नेते करताहेत मनोज जरांगेंची मनधरणी!!, असे चित्र आज पुण्यातून सगळ्या महाराष्ट्रासमोर आले.Maharashtra
पुण्यात परिवर्तन महाशक्तीची बैठक झाली. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी उपस्थित होते. त्यांनी या बैठकीत 150 जागा लढवायचा निर्णय घेतला लवकरच इतर जागांवरचा निर्णय देखील घेण्याचा निर्वाळा त्यांनी दिला. बरेच लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत. एकनाथ शिंदे असोत की देवेंद्र फडणीस त्यांच्या विरोधात देखील उमेदवार देणार असल्याची माहिती या नेत्यांनी दिली.
मनोज जरांगे यांच्याशी देखील आमचं बोलणं सुरु आहे. ते आमच्या सोबत येतील असे प्रयत्न सुरु असल्याची माहिती परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी दिली आहे. महादेव जानकर देखील आमच्यासोबत येतील असा दावा या नेत्यांनी केला.
पवार कसले परिवर्तन करणार??
सामान्य माणसाला आपलं वाटेल असं सरकार आम्ही स्थापन करण्याचा प्रयत्न करु. आम्ही चांगले उमेदवार देणार असल्याचे कडू म्हणाले. पवारसाहेब म्हणतात परिवर्तन आणू, पण तुम्ही कसलं परिवर्तन आणणार आहात??, असा सवालही कडू यांनी केला. तुम्ही इतके दिवस सत्तेवर होतात, मग आता कसं काय परिवर्तन तुम्ही करणार??, असा सवालही कडू यांनी उपस्थित केला. परिवर्तनाचा अधिकारी युतीलाही नाही आणि आघाडीलाही नाही. परिवर्तनाची भाषा करण्याचा अधिकार आम्हाला आहे. हे नवीन परिवर्तन हे खऱ्या अर्थानं कामाचं असेल, बजेटमधील हिस्सा हा सामान्य माणसाचा असल्याचे कडू म्हणाले.
स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आम्ही या निवडणुकीत देणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. आमनच्याकडे छोट्या मोठ्या 30 ते 40 संघटना असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. प्रस्थापित लोकांच्या विरोधात लढा देणारे उमेदवार देणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे. मनोज जरांगे यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. पण त्यांनी अद्याप निर्णय घेतला नाही. त्यांनी आमच्यासोबत यावं अशी आमची भूमिका असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App