
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Vanchit Bahujan Aghadi आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची तिसरी आघाडी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीत एकूण 30 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने 21 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीचे एकूण 51 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.Vanchit Bahujan Aghadi
The Vanchit Bahujan Aaghadi is pleased to declare its third list of candidates for the Maharashtra Assembly elections. #MaharashtraAssembly2024 #VoteForVBA #VoteForGasCylinder pic.twitter.com/kblZxhymY3
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) October 16, 2024
तृतीयपंथीय उमेदवाराला तिकीट
काही दिवसापूर्वी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आत्तापर्यंत 21 उमेदवारांची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकांसाठी वंचितच्या 11 उमेदवारांची पहिली यादी काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आली होती. त्यात वंचितकडून विधानसभा निवडणुकांसाठी प्रथमच तृतीयपंथी उमेदवाराला तिकीट देण्यात आले आहे. रावेर मतदारसंघातून शमिभा पाटील यांना तिकीट देण्यात आले आहे. शमिभा या तृतीयपंथीय असून सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानंतर 10 मुस्लीम उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता 30 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे एकूण 51 उमेदवार निश्चित झाले आहेत.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटापाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या देखील लवकरच उमेदवार ठरवून जागावाटप पूर्ण केले जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 7 उमेदवारांची घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडीने तब्बल 51 उमेदवारांची घोषणा केली आहे.
Vanchit Bahujan Aghadi 51 candidates for Assembly Elections
महत्वाच्या बातम्या
- Narendra Modi : मोदी बनले भाजपचे पहिले सक्रिय सदस्य; पंतप्रधानांनी सदस्यत्व मोहिमेला केली सुरुवात
- NCP SP : पवारांच्या राष्ट्रवादीत आलेत नेते 10, 7 वाटेवर; पण “चाणक्य खेळी”च्या बातम्या शेकड्यांवर!!
- CJI Chandrachud : संविधान बदलाच्या नॅरेटिव्हला सरन्यायाधीशांची थप्पड; ब्रिटिशकालीन न्याय देवतेचे भारतीयीकरण!!
- Supreme Court : फ्रीबीजवरून सुप्रीम कोर्टाची केंद्रासह निवडणूक आयोगाला नोटीस; याचिकाकर्त्यांची बंदीची मागणी