विशेष प्रतिनिधी
मुंबई : Baba Siddiqui राष्ट्रवादीचे माजी मंत्री माजी आमदार बाबा सिद्दिकी ( Baba Siddiqui ) यांच्या हत्येनंतर त्यांचे सलमान खान आणि बॉलीवूडची असलेले संबंध यांची भलामण करणाऱ्या भरपूर बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यातला एक अँगल जरी समोर आला असला, तरी फक्त बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे तेवढाच अँगल आहे, असे पोलीस आणि अन्य तपास यंत्रणा मानायला तयार नाहीत. कारण बाबा सिद्दिकी यांचे बऱ्याच “व्यवहारांचे” धागेदोरे मोठ्या माशांपर्यंत सुरुवातीपासूनच पोचले होते.Baba Siddiqui
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण जोरात सुरू आहे. शरद पवारांचे गट महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदा सुव्यवस्थेसाठी जबाबदार धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली म्हणजे जणू काही एक मसीहा गेला अशा स्वरूपाची पेशकष माध्यमांनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चालविली आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस आणि बाकीच्या तपास यंत्रणा वेगळ्या अँगलने देखील तपास करत आहेत. प्रत्यक्षात बाबा सिद्दिकी यांच्यावर 2000 कोटींचा SRA झोपडपट्टी पुनर्वसनाच्या घोटाळ्याचा आरोप होता. काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना 2002 ते 2004 या काळात बाबा सिद्दिकी म्हाडाचे अध्यक्ष होते. गँगस्टर दाऊद इब्राहिम याच्या गॅंगशी मनी लॉन्ड्रीग करून मुंबईत ठिकठिकाणी SRA झोपडपट्टी पुनर्वसनात “हात मारून” बाबा सिद्दिकी याने संपत्ती जमविल्याचा आरोप त्यांच्यावर होता. ईडीने त्यांची 464 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती.
ईडी आणि राष्ट्रीय तपास संस्था एनआयए यासंदर्भात लक्ष घालून बाबा सिद्दिकी यांना लवकरच अटक करणार होते. सिद्दिकी यांच्या अटकेनंतर त्यांच्यापेक्षा मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता असताना बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. त्यामुळे मोठे मासे अडकता अडकता राहिल्याची चर्चा मुंबईतल्या पोलीस प्रशासकीय वर्तुळात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App