विशेष प्रतिनिधी
नाशिक : मालेगाव मधील टेरर फंडिंगचे धागेदोरे राष्ट्रीय तपास संस्था एनआयएच्या छाप्यांमधून उलगडत असतानाच ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीवर ट्रेकिंगच्या नावाखाली केरळ मधल्या 10 मुस्लिम युवकांनी रेकी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र आणि नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
त्र्यंबकेश्वर मध्ये दीड वर्षांपूर्वीच काही मुस्लिम युवकांनी त्रंबकेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर धूप दाखवण्याचा प्रकार केल्यानंतर मुस्लिम जिहादींचे घातक मनसूबे उघडकीस आले होते. त्या पाठोपाठ आता त्र्यंबकेश्वर मध्ये केरळ मधले 10 मुस्लिम युवक आले. त्यांनी ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या भातखळा इथल्या धर्मशाळेत घुसून नमाज पठण केले. तिथे फोटो आणि व्हिडिओ देखील काढले. यावर स्थानिक युवकांनी अक्षय घेऊन त्र्यंबकेश्वर पोलिसांना कळविले. त्र्यंबकेश्वर पोलिसांनी या 10 मुस्लिम युवकांना ताबडतोब ताब्यात घेऊन त्यांची चौकशी आणि तपास सुरू केला.
Congress : काँग्रेसचे उत्तरेतले पुनरुज्जीवन प्रादेशिक पक्षांच्या मूळावर; महाराष्ट्रातही सत्ता खेचायचा “डाव” ठाकरे + पवारांच्या बळावर!!
केरळ मधून आपण फक्त ट्रेकिंग साठी ब्रह्मगिरीवर आलो आहोत. परंतु, नमाज पठाणाची वेळ झाल्याने आपण तिथे नमाज पठण केल्याचा दावा या मुस्लिम युवकांनी पोलिसांच्या चौकशी आणि तपासात केला.
मात्र दोनच दिवसांपूर्वी मालेगाव मध्ये राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने छापे घालून तिथल्या एका डॉक्टरला टेरर फंडिंगच्या आरोपाखाली पकडले. तो डॉक्टर जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे उघडकीस आले. त्या पाठोपाठ ज्योतिर्लिंग त्रंबकेश्वर मध्ये केरळ मधल्या 10 मुस्लिम युवकांनी ट्रेकिंगच्या नावाखाली रेकी करून धर्म शाळेत नमाज पठण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App