Manoj Jarange : नारायण गडावरच्या दसरा मेळाव्यात मनोज जरांगे मराठा + मुस्लिम समीकरण जुळवायच्या बेतात!!

Manoj Jarange

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बीड जिल्ह्यातल्या नारायण गडावरच्या दसरा मेळाव्यात मनोज जरांगे हे मराठा आणि मुस्लिम समीकरण जुळवायच्या बेतात आले आहेत. त्यांनी ओबीसी मधून मराठा आरक्षण दिल्याशिवाय निवडणूक आचारसंहिता लागू नका असा इशारा देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोगाला दिला आहे. Manoj Jarange plans to reconcile the Maratha + Muslim equation

मनोज जरांगे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातल्या नारायण गडावर शक्तिप्रदर्शन करणार आहेत पण या शक्ती प्रदर्शनात त्यांनी फक्त मराठा समाज हाच केंद्रबिंदू ठेवलेला नाही तर त्या पलीकडे जाऊन मराठा आणि मुस्लिम समीकरण जुळवायचा त्यांचा प्रयत्न दिसतो आहे. आज छत्रपती संभाजी नगर मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नारायण गडाच्या मेळाव्यात मराठा, मुस्लिम, बारा बलुतेदार सगळ्यांनी यावे, असे आवाहन केले. मराठा समाज मुस्लिम समाज 12 बलुतेदार मला मुख्यमंत्री व्हायचा आग्रह करत आहेत. पण मी स्वार्थी नाही. मी समाजाचा स्वार्थ पाहतो, असे मनोज जरांगे म्हणाले.


Actor Govinda : अभिनेता गोविंदाची मुंबई पोलिसांकडून पुन्हा चौकशी, गोळी आपोआप सुटण्यावर पोलिसांचा विश्वास नाही


पण आत्तापर्यंत मनोज जरांगे मराठा मेळावे घेत होते. त्यांनी मुस्लिम आरक्षणाची बाजू उचलून धरली होती. परंतु मराठा आरक्षणाच्या विषयात ते मुस्लिम आरक्षणाचा विषय फारसा मिसळत नव्हते. आता मात्र विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी नारायण गडावरचा दसरा मेळावा होत असल्याने त्या शक्ती प्रदर्शनाला मोठे राजकीय महत्त्व आले आहे. नेमका हा मुद्दा लक्षात घेऊन त्या शक्ती प्रदर्शनात आपण कुठे कमी पडता कामा नये, या हेतूने मनोज जरांगे यांनी चतुराईने मराठा, मुस्लिम आणि बारा बलुतेदार यांची मोट बांधायचा प्रयत्न चालविला आहे. समोरचे कितीही वेगवेगळे वर्ग करू द्यात, पण मराठा समाजच “हेडमास्तर” राहील, असा इशारा मनोज जरांगे यांनी देऊन शिंदे – फडणवीस सरकारविरुद्धच्या लढाईचे पुढचे पाऊल टाकले आहे.

Manoj Jarange plans to reconcile the Maratha + Muslim equation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात