Reservation : आरक्षणाचे राजकारण उपद्रव मूल्यावर आले; उमेदवार पाडायसाठी खांद्यावरच्या बंदुकांमधून नेम धरले!!

आरक्षणाचे राजकारण उपद्रव मूल्यावर आले, उमेदवार निवडून आणण्यासाठी नव्हे, तर ते पाडण्यासाठी खांद्यावरच्या बंदुकांमधून नेम धरले!!, असे म्हणायची वेळ मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके या एकमेकांच्या विरोधात कुठे राहिलेल्या मराठा आणि ओबीसी आंदोलकांच्या भूमिकेने आणली आहे. Political nuisance value, the only motive behind reservation agitations

जरांगे आणि हाके विधानसभा निवडणुकीत उतरायची भाषा करत आहेत, पण ते उमेदवार निवडून आणण्यापेक्षा पाडण्यासाठी निवडणुकीत उतरणार असल्याचे खुद्द त्यांचेच म्हणणे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप महायुतीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी जरांगे इर्षेला पेटले आहेत. त्याचीच प्रतिक्रिया उमटून लक्ष्मण हाके यांनी रोहित पवारांसह 50 उमेदवार पाडायची भाषा केली आहे. पण जरांगे आणि हाके “स्वतःच्या” राजकीय मर्जीचे “मालक” आहेत का??, हा यातून गंभीर सवाल तयार झाला आहे.

मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला सर्व प्रकारच्या “इंधनपुरवठा” नेमका कोणी केला??, याचे “उघड गुपित” सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. प्रकाश आंबेडकरांपासून ते महायुतीतल्या नेत्यांपर्यंत अनेकांनी जरांगे यांच्या “मास्टर माईंड”चे नाव उघडपणे घेऊन जरांगेंच्या आंदोलनाच्या विश्वासार्हतेवरच आघात केला आहे. त्यामुळे जरांगे मूळातच “स्वतःच्या” राजकीय मर्जीचे “मालक” नाहीत. हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती झाले आहे.


PM Modi : पंतप्रधान मोदींचे नीरज चोप्राच्या आईला पत्र; चुरमा पाठवल्याबद्दल आभार, ते खाऊन भावुक झालो!


जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून “मास्टर माईंड” स्वतःला हवे तसे नेम धरून बसले आहेत. तिसऱ्या आघाडीतून जरांगे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे करणे हा मास्टर माईंच्याच खेळीचा एक प्रकार असल्याचे आता उघडपणे महाराष्ट्रात बोलले जाऊ लागले आहे. म्हणूनच जरांगे फडणवीसांना पाडायची भाषा करत इर्षेने पेटून दसऱ्याच्या दिवशी रणमैदानात उतरणार आहेत. त्यावर टिप्पणी करताना लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांना राजकीय बोचकारा काढला आहे. 288 उमेदवार उभे करणे तर दूरच, ते 5 उमेदवारही उभे करू शकणार नाहीत. जरांगे खरंच विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार असतील तर त्यांनी त्यांचे आंदोलन ज्या घनसावंगी तालुक्यात झाले, तिथला उमेदवार जाहीर करून दाखवावा, असे आव्हान हाके यांनी दिले आहे. राजेश टोपे हे घनसावंगीचे शरद पवारांचे आमदार आहेत. त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचे आव्हान देऊन लक्ष्मण हाके यांनी बरोबर “नेम” धरून शॉट मारला आहे.

उमेदवार निवडून आणण्यापेक्षा पाडणे म्हणजेच स्वतःचे राजकीय उपद्रवमूल्य सिद्ध करणे हा “मास्टर माईंड” आणि मनोज जरांगे यांच्यातला “कॉमन फॅक्टर” आहे.

– जरांगेंच्या खांद्यावर मास्टर माईंडची बंदूक

लक्ष्मण हाके यांची उमेदवार पाडायची भाषा ही मनोज जरांगे यांच्या भाषेला प्रतिक्रिया स्वरूपात आलेली आहे. हाके यांच्या मागे छगन भुजबळ यांनी ताकद लावल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे, पण ती त्यांची स्वतःची ताकद किंवा उपद्रवमूल्य नव्हे, कारण हाके यांचे आंदोलन जरांगे यांच्या आंदोलनाएवढे वाढलेले किंवा विस्तारलेले दिसले नाही. पण जरांगेंच्या बाबतीत “तसे” म्हणता येणार नाही. गेल्या वर्षभरात जरांगे यांनी ज्या पद्धतीने आंदोलन उभे केले, किंबहुना त्यांच्या आंदोलनाला ज्या पद्धतीने सर्व प्रकारचा “इंधनपुरवठा” केला गेला, ते पाहता जरांगे यांचे उपद्रवमूल्य वाढावे, हाच त्यामागचा हेतू असल्याचे देखील उघडपणे दिसून आले. त्यामुळेच जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मास्टर माईंडनेच नेम धरला आहे, हे “उघड गुपित” अवघ्या महाराष्ट्राला समजले. या सगळ्यात मूळ आरक्षणाचा विषय केव्हाच मागे पडला आहे.

Political nuisance value, the only motive behind reservation agitations

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात