विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : इस्रायलच्या हल्ल्यात लेबनानमध्ये लपून बसलेला हिजबुल्लाचा दहशतवादी म्होरक्या हसन नसरल्लाह याचा खात्मा झाल्यानंतर भारतामध्ये जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी “शोक” व्यक्त केला. यातून जम्मू कश्मीर मधल्या कट्टरपंथीयांना चिथावणी मिळाली. या चिथावणीतूनच कट्टरपंथीयांनी विद्यार्थ्यांची बडगांमध्ये रॅली काढली आणि “हर घर से हिजबुल्ला निकलेगा” अशा घोषणा देत इस्रायल आणि भारताला धमकावणी दिली. Har Ghar Se Hezbollah Niklega…” Children in J&K hold protest against killing of Nasrallah by Israel
जम्मू काश्मीर मध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या त्यामध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन मतदान केल्याचे दिसले. जम्मू मध्ये लवकरच मतदान होणे अपेक्षित आहे. तिथे देखील वेगवेगळ्या प्रचार रॅल्यांमध्ये जनता उत्स्फूर्तपणे भाग घेताना दिसत आहे. अर्थातच त्यामुळे राज्यातल्या कट्टरपंथीयांना मोठा धक्का बसला आहे.
View this post on Instagram A post shared by Asian News International (@ani_trending)
A post shared by Asian News International (@ani_trending)
पण इस्रायल आणि हिजबुल्ला मधल्या संघर्षात इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाचा दहशतवादी म्होरक्या हसन नसराल्लाह याचा खात्मा झाला. त्याचबरोबर शेकडो दहशतवादी मारले गेले. याचे निमित्त करून जम्मू – कश्मीर मधल्या कट्टरपंथीयांनी डोके वर काढले.
बडगाममध्ये त्यांनी विद्यार्थ्यांची रॅली काढून इस्राइल आणि भारताला धमकी देणाऱ्या घोषणा दिल्या. “हर घर से हिजबुल्ला निकलेगा” या घोषणा विद्यार्थिनींच्या तोंडी होत्या. यातूनच जम्मू – काश्मीरला पुन्हा एकदा दहशतवादाच्या आगीत होरपळण्याचा कट्टरपंथीयांचा इरादा उघड्यावर आला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App