विशेष प्रतिनिधी
सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी “भगवा दहशतवाद” हे शब्द वापरून हिंदू समाजावर शरसंधान साधले होते. त्याचे 11 वर्षांनंतर आज पुन्हा एकदा त्यांनी समर्थन केले. Sushilkumar shinde statement bhagawa dahashatwad
याची कहाणी अशी :
जानेवारी 2013 मध्ये जयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात तत्कालीन गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी देशात झालेल्या दहशतवाराच्या घटनेला काही हिंदू संघटनांना जबाबदार धरत “भगवा दहशतवाद” हे शब्द वापरले होते. काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या शेवटच्या दिवशीच्या भाषणात शिंदे यांनी या भगव्या दहशतवादाचा उल्लेख केला होता. काही हिंदुत्ववादी संघटना दहशतवाद पसरवण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे चालवत असल्याचे गृह मंत्रालयाच्या तपासात समोर आले आहे, असे ते म्हणाले होते.
समझोता एक्सप्रेस, मक्का मशिद आणि मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासामध्ये काही हिंदू संघटना दहशतवादी प्रशिक्षण केंद्र चालवत असल्याचे समोर आल्याचे आल्याचा दावा सुशीलकुमार शिंदे यांनी त्या वेळच्या निवेदनात केला होता.
Rohit Pawar : स्टालिन यांनी वारस नेमला उदयनिधी; पवारांचीही नातवाला गादीवर बसवायची घाई!
त्यामुळे शिंदे यांच्यावर संपूर्ण देशातून चोहोबाजूंनी भरपूर हल्लाबोल झाला होता त्यानंतर सुशील कुमार शिंदे आणि दिग्विजय सिंह यांनी त्या वक्तव्यावरून घुमजाव देखील केले होते.
पण आज सोलापूरमध्ये पद्मशाली समाजाच्या मेळाव्यात बोलताना पुन्हा एकदा त्यांनी या प्रकरणावरून भाष्य केले. ते म्हणाले की, काही लोकांनी मी हिंदू दहशतवाद शब्द वापरला म्हणून माझ्यावर टीका केली. मी देशाचा गृहमंत्री होतो, जे रेकॉर्डवर आलं आहे ते सांगायचं नाही, तर मी माझ्या पॉकेटमधील सांगायचं का? या माझ्याबरोबर बसा, मी तुम्हाला समजाऊन सांगतो, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. Sushilkumar shinde
शिंदे यांनी त्यांच्या “फाइव्ह डिकेड्स इन पॉलिटिक्स” या पुस्तकात या घटनेचा उल्लेख करताना केंद्रीय गृहमंत्रालयाने तयार केलेले गोपनीय दस्तऐवज वाचून “भगवा दहशतवाद” हा श ब्दप्रयोग केला असल्याचे म्हटले आहे. मात्र, हे प्रकरण भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्याशी संबंधित असल्याने त्यांनी जाहीरपणे बोलण्यापूर्वी आरोपांची सत्यता पडताळून पाहिली, असेही शिंदे म्हणाले. शिंदे त्यांच्या पुस्तकात लिहितात, माझ्या त्या काळातील मीडिया स्टेटमेंट्स कोणी पाहिलं तर त्यांना दिसेल की मी “भगवा दहशतवाद” हे शब्द मी अतिशय काळजीपूर्वक वापरले होते!! Sushilkumar shinde
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App