विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आज अचानक “टार्गेट बदल” करत देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला. भाजप, संघ, विश्व हिंदू परिषद या संघटनांमधील अनेक बड्या नेत्यांची नावे घेऊन जरांगे यांनी अमित शाह यांना घेरायचा प्रयत्न केला. Manoj jarange shift target, trade guns to amit shah
पण आत्तापर्यंत फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करणाऱ्या मनोज जरांगे यांनी कधीच भाजपच्या किंवा शिवसेनेच्या नेत्यांची एवढ्या मोठ्या प्रमाणावर नावे घेतली नव्हती. ती आज एकदम त्यांनी अशोक सिंघल, प्रवीण तोगडिया, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, प्रमोद महाजन, सुषमा स्वराज, मोहन भागवत या बड्या नेत्यांची नावे घेतल्याने जरांगे यांना आजची स्क्रिप्ट नेमकी कुणी लिहून दिली??, की त्यांनी एकदम भाजपच्या केंद्रीय नेत्यांची नावे मराठा आरक्षण प्रकरणात गोवली??, असा सवाल तयार झाला.
मराठ्यांचे आंदोलन आमच्या पद्धतीने हाताळू, असे अमित शाह म्हणाल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या होत्या. अमित शाह यांच्या या कथित विधानाचा मनोज जरांगे यांनी समाचार घेतला. आम्ही तुमचा पॉलिटिकल एन्काऊंटर करू, असा इशारा त्यांनी दिला.
मनोज जरांगे म्हणाले :
– पटेलांचा वापर करून तुम्ही कोणत्या बेटावर काय केलं हे आम्हाला माहिती आहे. सिल्वासाच्या बेटावर काय केलं?? दमणमध्ये काय केलं?? अंदमानमध्ये काय केलं??, हे आम्हाला माहिती आहे. स्वत:च्या लोकांना खड्ड्यात घालून काय केलं हे आम्हाला माहिती आहे. पण माझ्या मराठ्यांचं आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत पडू नका. नाही तर तुमचा राजकीय एन्काउंटर करू!!
– अमित शाह, तुम्ही बरेच राजकीय एन्काउंटर केले. ते भयानक केले. प्रमोद महाजनांनी काय कमी केलं होतं??, अडवाणी कुठे कमी पडले होते??, कुठे मुरली मनोहर जोशी कमी पडले??, अशोक सिंघल, प्रवीण तोगडिया हे कुठे कमी पडले होते??, सुषमा स्वराज कुठे कमी पडल्या?? तुम्ही या लोकांना का मागे पाडलं?? तुम्ही गोवा, कर्नाटक, हरयाणा आणि तामिळनाडूत तेच केलं. तुम्ही वातावरण ढवळून काढण्यापर्यंत काम केलं. तोगडियांनी काम नाही केलं??, अशोक सिंघलांनी काम नाही केलं?? त्यांच्यावर पळून जाण्याची वेळ का आणली?? त्यांच्यावर वाईट परिस्थिती आणली. ही तुमची काम करण्याची पद्धत आहे. तुम्ही पक्ष आणि आंदोलन कसं हाताळतात हे सर्वांना माहिती आहे. मोहन भागवत खंबीर आहेत म्हणून टिकलेत. पण तुम्ही कुणालाही सोडलं नाहीत!!
– तुम्ही स्वत:ला महानबुद्धीचे समजता का?? राजकीय एन्काउंटर करणं हे बुद्धीवादी काम नाही. सत्तेच्या बळावर काहीही करता येतं. तुम्ही चांगलं काम करणाऱ्यांनाही संपवलं. हे विचार जास्त काळ टिकत नाही. एक दिवस जनतेची खदखद बाहेर येते, तेव्हा लोक सत्तेच्या विरोधात जातात. ज्या यंत्रणांचा वापर केला. त्याही बाजूला होतात. तुमच्या गोळ्या आणि रणगाडेही संपतील. जनता तुम्हाला घरात घुसून वठणवीर आणेल. तुम्हाला अशा पद्धतीने आंदोलन हाताळून मस्ती आली आहे. त्याच पद्धतीने आमचं आंदोलन हाताळून आंदोलन संपवणार असाल तर जनता तुम्हाला वठणीवर आणेल. गुर्जर, पटेल यांचं आंदोलन हाताळून कोणता तीर मारला??
– आंदोलन हाताळण्याची ही पद्धत नाही. ही दादागिरीची पद्धत आहे. तुमची काम करण्याची पद्धत सर्व यंत्रणांना माहिती आहे. सर्व नाराज आहेत. या देशातील व्यावसायिकही तुमच्यावर नाराज आहेत. तुमची काम करण्याची खुन्नशी वृत्ती तुम्हाला संपवणार आहे. तुमचे गुजरातचेच व्यापारी परदेशात चालले आहेत. तुम्ही लोकांना जाळ्यात घुसायला लावू नका. मराठ्यांचं आंदोलन नीट हाताळा. तुम्हाला वाटतं गुंड पाळलेले आहेत. यंत्रणा मागे लावू. कुणालाही काही करू. हे विसरा. प्रत्येक राज्यात स्वाभिमान असणारे गुंड आहेत!!
– मराठ्यांचं आंदोलन हाताळणार असं अमित शाह कोणत्या उद्देशाने बोलले ते पाहिलं नाही. त्यांचा उद्देश काय माहिती नाही. पण मराठ्यांचं आंदोलन हाताळणं एवढं सोपं नाही. अमित शाह हे शिर्डीला आले होते. तेव्हा आरक्षणाबाबत बोललो होतो. पण नागपूरला आले होते, तेव्हा ते बोलले नाहीत. साहेब मराठ्यांच्या नादी लागू नका. शाह साहेब तुम्हाला सरळ सांगतो, तुम्ही पटेल आंदोलन कसं हाताळलं, गुर्जर आंदोलन कसं हाताळलं तसंच मराठ्यांचं आंदोलन हाताळणार असाल तर तुम्हाला जाहीर सांगतो, अमित शाह आणि फडणवीस यांनाही सांगतो. तुम्हाला मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण द्यावेच लागेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App