काँग्रेस पक्षाच्या तीन पिढ्यांनी लष्कराचा आदर केला नाही
विशेष प्रतिनिधी
चंदीगड : बादशाहपूर येथील एका जाहीर सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) म्हणाले की, काँग्रेसचे राहुलबाबा हे खोटं बोलणारी मशीन आहेत. सरकार पेन्शनसह नोकऱ्या देऊ इच्छित नसल्याने अग्निवीर योजना आणल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र आपल्या सैन्याला तरुण ठेवण्यासाठीच अग्निवीर योजना तयार करण्यात आली आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या मुलांना सैन्यात पाठवण्यापूर्वी अजिबात संकोच करू नका. प्रत्येक अग्निवीरला पेन्शनसह नोकरी मिळेल.
हरियाणातील निवडणूक प्रचारासाठी आता आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते प्रचारासाठी मोठमोठ्या रॅली काढत आहेत. दरम्यान, गुरुग्रामच्या बादशाहपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक रॅलीला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
ते म्हणाले, “इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी… काँग्रेस पक्षाच्या तीन पिढ्यांनी लष्कराचा आदर केला नाही, वन रँक-वन पेन्शनची मागणी पूर्ण केली नाही. तुम्ही नरेंद्र मोदींना पंतप्रधान केले आणि ती मागणी पूर्ण केली आहे. वन रँक-वन पेन्शनच्या मागणीवर मोदींनी वन रँक-वन पेन्शनची तिसरी आवृत्तीही लागू केली आहे, आता नवीन वेतनासह पेन्शन दिली जाईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App