Rahul Gandhi राहुल गांधी भविष्यात परदेशात जाऊन भारतविरोधी मोहीम सुरू करू शकतात, असा आरोपही केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजप खासदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून राहुल गांधी यांचा पासपोर्ट तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी राहुल गांधींनी परदेशी भूमीवर केलेली विधाने ‘देशविरोधी’ असल्याचे म्हटले आहे, ज्यामुळे त्यांचे भारतीय नागरिक म्हणून वर्तन संशयास्पद असं ते म्हणाले. Rahul Gandhi
राहुल गांधी यांनी नुकतीच अमेरिकेत मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या ज्यावर भाजप सातत्याने आक्षेप घेत आहे. आता नवीन मुद्दा राहुल गांधींच्या पासपोर्टशी संबंधित आहे जो रद्द करण्याची मागणी केली जात आहे. Rahul Gandhi
राजस्थानच्या चित्तोडगडमधील भाजप खासदार सीपी जोशी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे, पत्रात सीपी जोशी यांनी राहुल यांचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली आहे. गांधींच्या पासपोर्टची कारणेही दिली आहेत.
Rahul Gandhi : राहुल गांधी ‘भ्रष्टाचाराच्या दुकाना’वर कारवाई करणार का? – भाजपचा सवाल
सीपी जोशी यांनी राहुल गांधींवर हे आरोप केले
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे देशाच्या अंतर्गत स्थैर्याला, सीमांची सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांना हानी पोहोचू शकते. परदेशी भूमीवर भारतीय उद्योगपतींविरोधात वक्तव्ये करणे हा देशाच्या प्रतिमेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. सीपी जोशी यांनी राहुल गांधींवर खलिस्तानी अजेंडाचा प्रचार केल्याचा आरोपही केला आहे.
सीपी जोशी म्हणाले की, राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा आणि ते या पदावर कायम राहिल्यास त्यांचा पासपोर्ट रद्द करण्यात यावा. राहुल गांधी भविष्यात परदेशात जाऊन भारतविरोधी मोहीम सुरू करू शकतात, जे देशाच्या शांतता आणि परराष्ट्र धोरणासाठी घातक ठरू शकते, असा त्यांचा आरोप आहे. Rahul Gandhi
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App