Atishi Marlena : आतिशी मार्लेना यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाच आमदारही झाले मंत्री

Atishi Marlena  आतिशी मार्लेना सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांच्यानंतर दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीत आजपासून आम आदमी पक्षाची नवी इनिंग सुरू झाली आहे. अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आता आम आदमी पार्टीने आतिशी यांना दिल्लीचे मुख्यमंत्री बनवले आहे. आतिशी यांनी शनिवारी संध्याकाळी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आतिशी व्यतिरिक्त आपच्या पाच आमदारांना आतिशींच्या मंत्रिमंडळात मंत्री करण्यात आले आहे. यामध्ये सौरभ भारद्वाज, गोपाल राय, कैलाश गेहलोत, इम्रान हुसेन आणि मुकेश अहलावत यांच्या नावांचा समावेश आहे.

आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्यानंतर सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांच्या यादीत सामील झाल्या आहेत. त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या आधी शीला दीक्षित यांनी हे पद भूषवले असून शीला दीक्षित यांच्या आधी सुषमा स्वराज यांनीही दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. यासह आतिशी या दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री बनल्या आहेत. ४३ वर्षीय अतिशी यांच्याकडे दिल्लीतील बहुतांश मंत्रालये सांभाळण्याची जबाबदारी आहे. त्या आम आदमी पक्षाच्या संस्थापक सदस्या होत्या. पक्षाची धोरणे तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Shambhuraj Desai : मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी महत्त्वाची बैठक, हैदराबाद गॅझेट शिंदे समितीकडे सुपूर्द

दिल्ली मद्य धोरणातील कथित घोटाळ्यांच्या आरोपात अडकलेले अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राज निवास येथे पोहोचल्यानंतर त्यांनी लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. यानंतर आप नेत्या आतिशी यांनी सरकार स्थापनेचा दावा केला होता. आतिशी यांच्या मंत्रिमंडळात यापूर्वीच्या चारही मंत्र्यांना पुन्हा मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर आरक्षित जागेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुकेश अहलावत यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

Atishi Marlena took oath as Chief Minister of Delhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात