Israel : युद्धानंतर इस्रायलची पुनर्बांधणी; बांधकाम क्षेत्रात 10000 नोकऱ्यांची भारतीयांना संधी!!

Israel

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Israel गाझा मधल्या युद्धानंतर इस्रायलची पुनर्बांधणी होत आहे. त्यासाठी भारताकडे मदत मागितल्यानंतर इस्त्रायलच्या मदतीला भारत धावणार आहे. त्यामुळे इस्त्रायलमध्ये भारतीयांना जवळपास 10000 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. पहिल्या फेरीत महाराष्ट्रातून ही भरती केली जाणार आहे. Israel

हमास दहशतवादी संघटनेची झालेल्या युद्धानंतर सध्या इस्त्रायलमध्ये कामगारांचा मोठा तुटवडा आहे. अपुऱ्या मनुष्यबळाचा इस्रायलला फटका बसतो आहे. त्यामुळे मनुष्यबळासाठी इस्रायलने भारताची मदत मागितली आहे. त्यामुळे भारतातून इस्रायलला मनुष्यबळ पुरवले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातून 10000 कामगार पाठवले जाणार आहेत.    Israel


Maharashtra :केंद्र सरकारचेही ‘महाराष्ट्र प्रथम, मराठी प्रथम’ हे ब्रिद, महत्वाच्या योजना मान्य, गुंतवणूकीतही वाढ


इस्रायलचे हमासबरोबर सध्या युद्ध सुरू आहे. युद्धादरम्यान पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवेतील कौशल्याची कमतरता आहे. ही दूर करण्यासाठी इस्रायलने भारताकडे मदत मागितली आहे. इस्रायल भारतातून 10,000 बांधकाम कामगार आणि 5,000 काळजीवाहकांची नियुक्ती करणार आहे. मात्र या नोकऱ्या अशा उमेदवारांना मिळणार आहे जे निकष आणि प्रशिक्षण पूर्ण केलेले असतील. इस्रायलची लोकसंख्या, इमिग्रेशन आणि बॉर्डर ऑथॉरिटी (PIBA) ने बांधकाम कामगारांसाठी चार कामांसाठी मनुष्यबळाची मागणी केली आहे. त्यात फ्रेमवर्क, लोखंडी कामकाज, प्लास्टरिंग आणि सिरेमिक टाइलिंग येणाऱ्या लोकांची मागणी केली आहे. Israel

इस्रायलच्या PIBA ची एक टीम भारतात भेट देत आहे. यावेळी ते कौशल्य मुल्यांकन करतील. त्यानंतर निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचीही निवड करतील. त्यानंतर या कामगारांना इस्रायलमध्ये काम करता येणार आहे. बांधकाम कामगारांची ही भरती  महाराष्ट्रात होणार आहे. भारताच्या या मदतीमुळे इस्रायलला मनुष्यबळ मिळणार आहे. तर भारतीयांना रोजगाराची संधी मिळणार आहे.  Israel

Israel Job Opportunities For Maharashtra Workers10000 Jobs In Israel

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात