Jharkhand : झारखंडमध्ये डेमोग्राफी बदलाचा अलार्म; आदिवासी हिंदूंची लोकसंख्या घटली, मुस्लिमांची लोकसंख्या वाढली!!

Jharkhand

विशेष प्रतिनिधी

रांची : Jharkhand झारखंडमध्ये राजकीय गदारोळात ज्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही, तो मुद्दा म्हणजे लोकसंख्येतील प्रमाणाच्या बदलाचा. झारखंडमध्ये डेमोग्राफी बदलाचा अर्थात लोकसंख्या बदलाचा अलार्म वाजला असून राज्यात आदिवासी हिंदूंची संख्या घटून मुस्लिमांची संख्या बेसुमार वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. Jharkhand

1951 च्या जनगणनेत झारखंड मध्ये आदिवासींची संख्या 36 % होती, 2011 ती 10 % नी घटून 26 % झाली आहे, तर मुस्लिमांची लोकसंख्या 9 % वरून 14.5 % वर पोहोचली आहे. हिंदूंची लोकसंख्या 7 % नी घटली आहे. 2011 मध्ये हिंदूंची लोकसंख्या 88 % होती, ती आता 81 % झाली आहे. संथाल आदिवासी परगण्यातील 6 जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या बदलाचा सर्वाधिक दुष्परिणाम झाला असून साहेबगंज आणि पाकुड या 2 जिल्ह्यांमध्ये तर मुस्लिमांची लोकसंख्या 35 % नी वाढल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने संसदेत या संदर्भात माहिती दिली आहे.Jharkhand

बांगलादेशी घुसखोरांनी झारखंड मधल्या विविध गावांवर कब्जा केला असून त्यामुळे लोकसंख्या बदलत भर पडली आहे. आदिवासींची जमीन हडपणे, मालमत्तेवर कब्जा करणे असले प्रकार झारखंड मधल्या विविध गावांमध्ये सुरू आहेत. झारखंड मधल्या आदिवासी आरक्षणावर याचा दुष्परिणाम झाला असून आदिवासींना उपलब्ध असलेल्या सरकारी नोकऱ्या आणि सवलतींमध्ये परिणामतः घट झाल्याचे दिसून येत आहे. या सगळ्या प्रकारा विरोधात जामताडाच्या यज्ञ मैदानामध्ये संथाल आदिवासी संमेलनामध्ये माजी मुख्यमंत्री बापूलाल मरांडी यांनी जनआक्रोश रॅली काढली होती. त्यामध्ये स्वतःच त्यांनी झारखंड मधल्या लोकसंख्या धोकादायक बदलाचा अलार्म वाजविला.

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस त्याचबरोबर भाजप यांची सरकारी राहिली. सध्या झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांचे सरकार आहे. परंतु, यापैकी कुठल्याही सरकारने आदिवासींच्या धर्मांतराकडे आणि बांगलादेशी घुसखोरांकडे लक्ष देऊन त्याला परिणामकारक अटकाव केला नाही. झारखंडमध्ये वाढलेली मुस्लिम लोकसंख्या आणि घटलेली आदिवासी आणि हिंदूंची लोकसंख्या हे त्याचे निदर्शक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Jharkhand dangerous demographic change, muslim population increases

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात