जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १८ सप्टेंबरला होणार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आगामी जम्मू-काश्मीर ( Jammu and Kashmir ) विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. या यादीत सहा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
या यादीत आरएस पठानिया हे उधमपूर पूर्वमधून तर नसीर अहमद लोन बांदीपोरामधून निवडणूक लढवणार आहेत. कर्नाळ जागेवरून मो. इद्रिस कर्नाही यांना तिकीट मिळाले आहे. गुलाम मोहम्मद मीर हे हंदवाडा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार असतील. फकीर मोहम्मद खान गुरेझमधून निवडणूक लढवणार आहेत. अब्दुल रशीद खान सोनावरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
डॉ.भारत भूषण कठुआ मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून, राजीव भगत यांना बिष्णामधून तिकीट मिळाले आहे. सुरिंदर भगत यांना पक्षाने मढमधून उमेदवारी दिली आहे. पक्षाने बहू मतदारसंघातून विक्रम रंधावा यांना तिकीट दिले आहे. यावेळी भाजपने जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांना तिकीट दिलेले नाही.
जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १८ सप्टेंबरला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 25 सप्टेंबरला होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान १ ऑक्टोबरला होणार आहे. तर ४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App