फक्त श्रीमंतांना वाचवण्याचे उद्योग ? आव्हाडांच्या क्लीपवरून अंजली दमानिया यांचा संताप
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बलात्कार प्रकरण मिटवायची माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यावर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर फक्त श्रीमंतांना वाचविण्याचे उद्योग म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना सवाल केले आहेत. Jitendra Awhad
एका धनदांडग्यांनाचे बलात्काराचे प्रकरण शरद पवार यांचे नाव घेऊन मिटविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड करत असल्याची धक्कादायक क्लिप व्हायरल होत आहे. यावर दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. एक्स या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की आज हा इतका भयानक विषय, मीडिया ने का बरं वाजवला नाही? अगदी तुरळक दाखवला.खरं तर या सगळ्या राजकारण्यांचा ढोंगीपणा लोकांना दिसला पाहिजे. हा कॉल २ वर्षापूर्वीचा आहे असे म्हणतात, म्हणजे ह्यांची सत्ता होती. म्हणजे हे सत्तेत असतांना हे असले धंदे करायचे ? एका पीडित महिलेले आत्महत्या करते म्हंटले तर तिला ‘मर’ म्हणतांना ह्यानं क्लेश कसे झाले नाही?
फक्त श्रीमंतांना वाचवण्याचे उद्योग ?आव्हाड, राऊत, शरद पवार, सुप्रिया सुळे जो आव आणतात आणि ते खरे कसे आहेत हे ह्यावरून दिसते. आज का सुप्रिया सुळे बोलल्या नाहीत? का त्यांनी आव्हाडांचा निषेध केला नाही? मीडियाने त्यांना घेरले पाहिजे.
आज हा इतका भयानक विषय, मीडिया ने का बरं वाजवला नाही? अगदी तुरळक दाखवला. खरं तर या सगळ्या राजकारण्यांचा ढोंगीपणा लोकांना दिसला पाहिजे. हा कॉल २ वर्षापूर्वीचा आहे असे म्हणतात, म्हणजे ह्यांची सत्ता होती… म्हणजे हे सत्तेत असतांना हे असले धंदे करायचे ? एका पीडित महिलेले आत्महत्या… https://t.co/7U8hyYfsJs — Mrs Anjali Damania (@anjali_damania) August 26, 2024
आज हा इतका भयानक विषय, मीडिया ने का बरं वाजवला नाही? अगदी तुरळक दाखवला.
खरं तर या सगळ्या राजकारण्यांचा ढोंगीपणा लोकांना दिसला पाहिजे. हा कॉल २ वर्षापूर्वीचा आहे असे म्हणतात, म्हणजे ह्यांची सत्ता होती… म्हणजे हे सत्तेत असतांना हे असले धंदे करायचे ? एका पीडित महिलेले आत्महत्या… https://t.co/7U8hyYfsJs
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) August 26, 2024
दमानिया यांनी म्हटले आहे की हे ऐकून तळ पायाची आग मस्तकात गेली. याचे उत्तर मिळालेच पाहिजे. टी सिरीज मालकाने केले म्हणून शरद पवार, प्रफुल पटेल आणि आव्हाड कुणा एका बाई वर अत्याचार होऊ देणार? ती मुलगी न्याय मागायला आली, आत्महत्या करत होती असे सांगितलं, तर, “मरू दे तिला” असे आव्हाड तुम्ही बोललात ? Jitendra Awhad
या प्रकरणी मनसेनेही चौकशीची मागणी केली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले प्रसार माध्यमांवर काल ही क्लिप वायरल झाली होती. जर एखाद्या शिपायाने बलात्कार केला तर ते माफ करण्याजोगे नाही. त्याला शिक्षा झाली पाहिजे पण श्रीमंत माणसाने बलात्कार केला तर त्या माणसाला प्रकरणा दाबता येते का?ही जुनी व्हायरल क्लिप असू शकते. कारण सगळ्या मोठ्या नेत्यांची नावे घेतली आहेतहे प्रकरण गंभीर आहे हा मल्लिकार्जुन पुजारी ज्याचे नाव घेतले आहे, हा कोण आहे याची चौकशी व्हावी पूर्णपणे पडताळणी केली पाहिजे आणि संपूर्ण प्रकरण जगासमोर आले पाहिजे या व्हायरल क्लिपची पूर्णपणे पडताळणी पोलिसांनी केली पाहिजे. कोण मुलगी आहे, कोणी केलं वैगरे पोलिसांनी शोध घेतला पाहिजे.
सुप्रिया सुळे यांनी याची चौकशी करण्याची मागणी करावी, असे देशपांडे म्हणाले. या प्रकरणाची माहिती अशी की कॅसेट किंग गुलशन कुमार यांचे पुत्र आणि टी सीरीज या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. टी सीरीजमध्ये काम देण्याचं आमिष दाखवून एका तीस वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.या महिलेने आरोप केले होते की टी सिरीजच्या आगामी चित्रपटात काम देण्याचं आमिष दाखवून भूषण कुमार यांनी माझ्यावर 2017 पासून 2020 पर्यंत वेळोवेळी बलात्कार केले. तसंच तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबत एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यात पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या मलिकार्जुन पुजारी या सामाजिक कार्यकर्त्याला जितेंद्र आव्हाड धमकी देत आहे. यामध्ये ते म्हणत आहेत की हे प्रकरण शरद पवारांकडे गेले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App