वृत्तसंस्था
रांची : झारखंड विधानसभा निवडणूक भाजप आणि आजसू एकत्र लढणार आहेत. आजसू प्रमुख सुदेश महतो यांनी सोमवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah )यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा केली. सुदेश महतो आणि अमित शहा यांच्यात दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत एकत्र निवडणूक लढविण्यावर एकमत झाले. मात्र आजसू किती जागा लढवणार हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये एक करार झाला होता, परंतु निवडणुकीपूर्वी आजसू वेगळे झाले. याचा फटका दोन्ही पक्षांना सहन करावा लागला. भाजप 28 जागांवर अडकला होता, तर आजसूला दोन जागा मिळाल्या होत्या.
कुर्मी मतदारांना आकर्षित करण्याची तयारी
झारखंडमध्ये कुर्मी मतदारांची निर्णायक भूमिका आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी कुर्मींवर लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेसने केशव महतो कमलेश यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केले आहे. त्याचबरोबर कुर्मी मतांवर जेएमएमची आधीच चांगली पकड आहे. अशा परिस्थितीत भाजपने आजसूसोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
JMM नेते निर्मल महतो यांनी आजसूची स्थापना केली होती
आजसूची स्थापना JMM नेते निर्मल महतो यांनी केली होती. ते बराच काळ झामुमोसोबत होते. नंतर आजसूदेखील अनेक वेळा तुटले. सुदेश महतो 2000 पासून आजसूचे नेतृत्व करत आहेत. 2007 मध्ये सुदेश यांनी पक्षाची पुनर्रचना केली. काही प्रसंग वगळता आजसू 2000 पासून सतत NDA सोबत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला गिरिडीहची जागा जिंकण्यात यश आले.
झारखंडमध्ये निवडणूक कधी?
येत्या काही महिन्यांत झारखंडमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचवेळी JMM नेते चंपाई सोरेन देखील येत्या काही दिवसांत आपली नवी राजकीय खेळी उघड करणार आहेत. चंपाई स्वतःचा नवा पक्ष काढू शकतात, अशी चर्चा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App