वृत्तसंस्था
कीव्ह : युक्रेनमध्ये युद्ध आणखी भडकले आहे. रशियाने सोमवारी पहाटे युक्रेनला पुन्हा हादरवून टाकले. गेल्या अडीच वर्षांतील सर्वात मोठा हल्ला करण्यात आला. रशियाने युक्रेनच्या तब्बल 35 शहरांवर हल्ले केले. रशियन बॉम्बवर्षाव करणाऱ्या टुपोलेव्हने युक्रेनच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी करून हल्ला केला. Russia Bombs As Many As 35 Cities In Ukraine
काळा समुद्र व कॅस्पियन सागर भागातून 100 स्कड क्षेपणास्त्रे, 100 किलर ड्रोनही डागले. युक्रेनच्या 24 पैकी 15 प्रांतांतील हल्ल्यात सर्वाधिक हल्ले राजधानी कीव्हवर ३० ड्रोन व क्षेपणास्त्राने झाले. युक्रेनने ही क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा केला आहे. रशियन हल्ल्यात युक्रेनचे १० ऊर्जा प्रकल्प व 15 पाणीपुरवठा करणारी केंद्रे उद्ध्वस्त झाली. 12 शहरे काळोखात बुडाली.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे दुःखद निधन; हैदराबादेतील रुग्णालयात सुरू होते उपचार
आतापर्यंत पूर्व युक्रेनच्या शहरांवर हल्ले करणाऱ्या रशियाने या वेळी पश्चिम युक्रेनच्या लुत्सक शहराला लक्ष्य केले. रशियाने युक्रेनमध्ये इव्हानो-फ्रेंकविस्क हवाई तळावरही हल्ला केला. त्यात दोन एफ-16 जेट व हवाई पट्टीची नुकसान झाले. हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला. 150 हून जास्त जण जखमी झाले. मृतांत रायन इव्हान्स हा ब्रिटिश नागरिकही आहे.
युक्रेनचा पलटवार- रशियात 9/11 सारखा हल्ला
युक्रेनने प्रत्युत्तरादाखल हल्ला केला. सोमवारी सकाळी रशियाच्या सारातोव्ह शहरातील एका रहिवासी इमारतीचे युक्रेनच्या ड्रोनने नुकसान झाले. 9/11 सारख्या हल्ल्यात युक्रेनचे ड्रोन इमारतीला धडकून कोसळले. त्यात इमारतीमधील चार लोक जखमी झाले. जवळच्या इंजिल्स शहरातही युक्रेनच्या ड्रोनहल्ल्यात एका रहिवासी इमारतीचे नुकसान झाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App