96 कार्यालयांमध्ये काम सुरू आहे, अशीही माहिती दिली आहे
विशेष प्रतिनिधी
पणजी : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा JP Nadda यांनी शनिवारी सांगितले की, भाजपने देशभरात 768 पक्ष कार्यालये स्थापन करण्याची योजना आखली आहे. त्यापैकी 563 कार्यालये पूर्ण झाली आहेत. पणजीजवळ गोवा भाजप मुख्यालयाच्या पायाभरणी समारंभाला नड्डा उपस्थित राहणार होते, परंतु त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे कार्यक्रमाला संबोधित केले.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यालयाची पायाभरणी केली. डिसेंबर 2026 पर्यंत नवीन इमारत तयार होईल, असे सावंत यांनी सांगितले.
Narendra Modi : ‘कीव’मध्ये पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत, राष्ट्राध्य झेलेन्स्कींशी विशेष भेट
नड्डा म्हणाले, केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सरकार आणि पक्ष संघटनेशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. प्रत्येक राज्याच्या राजधानीत भाजपचे मुख्यालय आणि प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचे कार्यालय स्थापन करणे हा मोदी-शाह यांनी घेतलेल्या प्रमुख निर्णयांपैकी एक होता.
नड्डा म्हणाले, JP Nadda पक्षाने ७६८ कार्यालये तयार करण्याचा निर्णय घेतला, त्यापैकी ५६३ पूर्ण झाली आहेत. ९६ कार्यालयात काम सुरू आहे. नड्डा यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जून २०१३ मध्ये गोव्यात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती त्यावेळच्या आठवणी सांगितल्या.
ते म्हणाले, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेसचे सरकार पाडण्याचा ठराव घेण्यात आला. त्या बैठकीनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम केले, ज्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार २०१४ मध्ये सत्तेवर आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App