विशेष प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण आणि जातीयवादाला केवळ शरद पवार जबाबदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीयवादाचे राजकारण सुरू झाल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. Raj Thackeray criticized Sharad Pawar’s politics, casteism, divided the saints
राज ठाकरे यावेळी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून यासाठी त्यांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. विदर्भ दौऱ्यावर . असताना नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, जातीयवादाला केवळ शरद पवार जबाबदार आहेत. शरद पवारांनीच महाराष्ट्रात या गोष्टींची सुरुवात केली. त्यांनी अनेक आमदार फोडलेत. त्यानंतर त्यांनीच जातीचं विषही कालवलं. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्माच्या आधीचा महाराष्ट्र आणि त्यानंतरचा महाराष्ट्र यात खूप फरक आहे. याआधी कधीच जातींमध्ये महापुरुषांची विभागणी झालेली नव्हती. संतांना संत म्हणूनच बघितलं जायचं. त्यांना जातींमध्ये बघितलं जात नव्हतं. पण या सगळ्या गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरु झाल्या. याआधी असा महाराष्ट्र कधीच नव्हता. त्यामुळे १९९९ पासून जातीजातींमध्ये विष पसरवणं सुरु झाले.
लोकसभा निवडणूकीवेळी महाविकास आघाडीने संविधान बदलणार असे वक्तव्य केल्यामुळे तसे वातावरण तयार झाले. त्यामुळे देशातील जवळपास एक गठ्ठा दलित समाजाने मोदी आणि शाहांच्या विरोधात मतदान केलं. हे मतदान उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या प्रेमाखातर झालेलं नसून अँटी मोदी आणि अँटी शाह मतदान होतं. गेल्या पाच वर्षांत या लोकांनी केलेलं गलिच्छ राजकारण मतदार विसरणार नाहीत. या गोष्टींचा राग ते येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत निश्चित काढतील,” असेही राज ठाकरे म्हणाले.
Narendra Modi : ‘कीव’मध्ये पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत, राष्ट्राध्य झेलेन्स्कींशी विशेष भेट
आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार
महाराष्ट्रात आम्ही सर्व जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्याही विरोधात उमेदवार देऊ.तसेच आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असणाऱ्या वरळीतून उमेदवार देऊ अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
राज ठाकरे म्हणाले की, ‘वरळी विधानसभेत आमची ३७ ते ३८ हजार मते आहेत. मागच्या वेळी आम्ही निवडणूक लढवली नाही. एकदा ही गोष्ट झाली. वारंवार कशी होईल. यावेळी आम्ही वरळी विधानसभेत उमेदवार देणार आहोत. विधानसभेच्या तिकीट वाटपावरून महायुती आणि मविआमध्ये हाणामाऱ्या सुरू होतील, हे मी सांगितले होते. याची झलक लोकसभेला पाहायला मिळाली. त्यामुळे आमच्यासाठी आता वातावरण पोषक आहे. मागच्या पाच वर्षात राज्यात ज्या प्रकारचा राजकीय खेळ झाला, त्याला लोक कंटाळलेले आहेत. सर्व मतदारसंघात उमेदवार देणार आहे. लोक माझ्या हाती सत्ता देतील.’
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App