Janiv Jagar Aandolan : महाविकास आघाडीला जाणीव जागर’ आंदोलनातून भाजपचे उत्तर

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बदलापूरमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचे राजकारण करत महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र न्यायालयाने फटकारल्यांनतर आता मुक आंदोलन सुरू केले आहे. भाजपने राज्यात ठिकठिकाणी जाणीव जागर आंदोलन करून त्याला उत्तर दिले. BJP answer Janiv Jagar Aandolan

अमरावतीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत’जाणीव जागर’ आंदोलन झाले.

यावेळी बावनकुळे म्हणाले की, बदलापूरची घटना हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. हा विषय राजकारणाचा होऊ शकत नाही. राजकारण करण्याकरता महाराष्ट्रात खूप विषय आहेत. या घटनेमध्ये दोषी असणाऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.’


Ramdas Athawale : ‘बदलापूरची घटना मानवतेसाठी लज्जास्पद असून आरोपींना…’ ; रामदास आठवले


झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा, सायन सर्कल येथे भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात ‘जागर महाराष्ट्राचा जागर जाणिवेचा’ आंदोलन झाले महिला अत्याचारप्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुतोंडी भूमिका उघड करण्यासाठी आणि बदलापूर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्या वतीनं मुख आंदोलन असल्याचे लाड यांनी सांगितले.

नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले आहे

मूक आंदोलना दरम्यान भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महिलांच्या सन्मानार्थ शपथ घेतली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला सक्षमीकरण आणि महिला सबलीकरण मोहीम राबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर येथे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. सवे म्हणाले, बदलापुर येथील चिमुकलीवर अत्याचार केलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अशी प्रवृत्ती असलेल्या लोकांना या जगात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. महिलांच्या सन्मानासाठी आम्ही आंदोलन केलं आहे. महाविकास आघाडी ही राजकारण करते. आम्हांला राजकारण करायचं नाही, त्या चिमुकलीला न्याय मिळवून द्यायचा आहे.

BJP answer Janiv Jagar Aandolan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात