Sharad Pawar : पवारांच्या मनात अजूनही सुधाकरराव नाईक प्रयोगाची भीती; मुख्यमंत्रीपदाची सोडली खुर्ची; पोस्टर्सवरच्या मुख्यमंत्र्यांची हवा काढली!!

Sharad pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शरद पवारांच्या Sharad pawar मनात अजूनही सुधाकरराव नाईक प्रयोगाची भीती बसली असून त्यातूनच त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांची भावी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडून दिली, पण त्यामुळेच पोस्टरवरच्या मुख्यमंत्र्यांची हवा निघाली. काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांच्या फुग्यांमध्ये हवा भरली गेली Sharad pawar left NCP’s claims for chief ministerial post

त्याचे झाले असे :

महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू असताना शरद पवारांनी आज अचानक पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडून दिला. त्यामुळे महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाची स्पर्धा शिवसेना आणि काँग्रेस या दोनच पक्षांमध्ये उरली. त्यातही ही स्पर्धा काँग्रेसमधल्या वेगवेगळ्या गटात मध्येच सुरू झाली.


Vinesh Phogat : विनेश फोगटने दिल्ली पोलिसांवर केला ‘हा’ मोठा आरोप!


पण ज्या प्रकारे शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडून दिला, त्यातून एक बाब अधोरेखित झाली, ती म्हणजे शरद पवारांच्या मनात आजही सुधाकरराव नाईक प्रयोगाची भीती कायम बसलेली दिसून आली. आपण आपल्याच पक्षातल्या कुठल्या नेत्याला मुख्यमंत्री करायचे आणि तो नेता नंतर आपले ऐकणे सोडून देणार, इतकेच नाही, तर आपल्या समर्थकांना तुरुंगातही घालायला पुढे मागे पाहणार नाही. हा जळजळीत अनुभव पवारांनी सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री करून घेतला होता. त्यामुळे आपल्या पक्षात कोणाच्या मुख्यमंत्रीपदाचे झेंगटच नको. ते आपल्याला झेपायचे नाही. त्यापेक्षा नुसत्या सत्ताबदलावर खेळत राहू, असा पोक्त विचार शरद पवारांनी केला आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडून दिला. पण पवारांनी तो दावा सोडल्यामुळे त्यांच्याच पक्षामधल्या पोस्टर्स वर चढलेल्या मुख्यमंत्र्यांची हवा निघाली.

पवारांच्या राष्ट्रवादीत उरलेले नेते जयंत पाटील, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांची नावे त्यांचे समर्थक वारंवार पोस्टरवर भावी मुख्यमंत्री म्हणून लावत असतात. अगदी मुंबईतल्या राष्ट्रवादी भवन समोर देखील ही पोस्टर्स झळकत असतात, पण पवारांनी आमच्याकडून मुख्यमंत्री पदासाठी कोणीही इच्छुक नाही. मी तर मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. आत्ता मुख्यमंत्री पदाचा प्रश्न राष्ट्रवादीसमोर नाही. महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्यासाठीच आमचा पक्ष काम करेल, अशा परखड शब्दांमध्ये मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडून दिला. त्यामुळे पोस्टरवरच्या मुख्यमंत्र्यांची हवा निघून गेली पण दुसरीकडे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातल्या नेत्यांच्या महत्त्वाकांशी फुग्यांमध्ये हवा भरली गेली.

Sharad pawar left NCP’s claims for chief ministerial post

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात