MPSC : एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलली सरकारच्या सूचनेने; पण विद्यार्थी मात्र रोहित पवारांच्या पुढाकाराने शरद पवारांच्या भेटीला!!

MPSC

विशेष प्रतिनिधी

पुणे : एमपीएससी आणि आयबीपीएस यांच्या संदर्भातल्या परीक्षांच्या तारखा एकच आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यानंतर शिंदे -‘फडणवीस सरकारने एमपीएससी बोर्डाला सूचना करून एमपीएससी पूर्व परीक्षेची तारीख पुढे ढकलायला लावली. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून त्याची तपशीलवार माहिती दिली. MPSC pre-examination postponed due to Govt

मात्र, या सगळ्या प्रकारात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार खासदार सुप्रिया सुळे आणि नंतर स्वतः शरद पवार विद्यार्थी आंदोलनात घुसले. त्यातून राष्ट्रवादीच्या दबावाने एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलली, असे चित्र निर्माण करायचा प्रयत्न त्यांनी केला. प्रत्यक्षात सरकारने सूचना केल्यानंतर ही पूर्व परीक्षा पुढे ढकलली गेली.

मात्र आता एमपीएससीचे काही विद्यार्थी रोहित पवारांच्या पुढाकाराने शरद पवारांच्या भेटीसाठी पुण्यातल्या त्यांच्या “1 मोदी बाग” या निवासस्थानी पोहोचले. शरद पवारांनी या विद्यार्थ्यांशी चर्चा केली.


Vinesh Phogat : विनेश फोगटने दिल्ली पोलिसांवर केला ‘हा’ मोठा आरोप!


 

विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून बांगलादेशात इस्लामी जिहादी पक्षांनी सत्ता हस्तगत केली. तशा स्वरूपाचा उद्रेक महाराष्ट्रात किंवा देशात घडवून सत्ता काबीज करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे त्यांच्या अनेक पक्षांच्या नेत्यांच्या तोंडून बाहेर आले. यापैकी रोहित पवार एक होतेच. रोहित पवारांनी देखील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या सुरुवातीलाच भारतात “बांगलादेश” घडण्याची भाषा वापरली होतीच. त्याही आधी त्यांचे आजोबा शरद पवारांनी महाराष्ट्रात “मणिपूर” घडेल असे राजकीय भाकित वर्तविले होतेच. या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या आंदोलन विद्यार्थ्यांची शरद पवारांची झालेली भेट संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

शरद पवारांना केंद्र सरकारने झेड प्लस सिक्युरिटी दिली. त्या सिक्युरिटी वर शरद पवारांनी संशय व्यक्त केला. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आपल्या बद्दलची ऑथेंटिक माहिती मिळवण्यासाठी कदाचित आपल्याला झेड प्लस सुरक्षा व्यवस्था दिली असावी, असे वक्तव्य शरद पवारांनी करून केंद्र सरकारवर संशयाचे जाळे टाकण्याचा प्रयत्न केला. पण ह्याच शरद पवारांनी आंदोलक एमपीएससीच्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन आपल्या भोवतीचाच संशय गडद केला.

MPSC pre-examination postponed due to Govt

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात