विशेष प्रतिनिधी
पुणे : सर्व शाळांमध्ये पूर्ण वेळ महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात यावेत.. शिक्षकेतर कर्मचार्यांचे पाेलीस व्हेरीफिकेशन व चारित्र्य पडताळणी करण्यात यावी. सीसीटीव्ही यंत्रणेचे ॲाडीट करण्यात यावे. हे कॅमेरे चालू स्थितीत आहेत का? त्यांची संख्या पुरेशी आहे का? ते योग्य ठिकाणी लावले गेले आहेत का? याचा तपास करण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्ष महिला माेर्चाच्या शिष्टमंडळाने पाेलीस आयुक्तांकडे केली. Appoint full time women police in all schools, BJP delegation demands to police commissioner
पुणे शहर भाजपा महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाने विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे व महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा महिला मोर्चा, पुणे शहराच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली . त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देखील सादर केले.
शहरातील सर्व शाळांची बैठक घ्यावी. सुरक्षेबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सक्त सूचना द्याव्यात. दामिनी पथकाचा प्रभावी वापर करुन त्यांच्या मदतीने या पद्धतीचे गुन्हे रोखता येतील का? याबाबत देखील सखोल विचार व्हावा.
आदी मागण्यांचा समावेश होता. अमितेश कुमार यांनी या सर्व मागण्यांवर लवकरात लवकर पोलीस प्रशासनाकडून निश्चितपणे काम केले जाईल असे आश्वासन दिले आहे. पुणे शहर भारतीय जनता पार्टीतर्फे देखील या संदर्भात विद्यार्थी आणि पालकांचे प्रबोधन आणि जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. पुण्यातील पक्षाचे १०० माजी नगरसेवक त्यांच्या प्रभागामध्ये कार्यक्रम घेतील. त्यासोबतच येत्या २९ ऑगस्टला शहर स्तरावर कार्यक्रम घेतला जाईल. यामध्ये सर्व संस्थाचालक, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक सहभागी होतील. यावेळी पुण्याचे पोलिस आयुक्त या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत.
या शिष्टमंडळात भाजपा पुणे शहर अध्यक्ष श्री धीरजजी घाटे व महिला मोर्चा अध्यक्ष सौ. हर्षदाताई फरांदे यांच्यासह भाजपा पुणे शहर सरचिटणीस वर्षाताई तापकीर, पुनीतजी जोशी, मा. नगरसेविका मंजुश्रीताई खर्डेकर, महिला मोर्चा सरचिटणीस शामाताई जाधव, उज्वलाताई गौड, गायत्रीताई खडके, प्रियांकाताई शेंडगे, स्वातीताई मोहोळ, खुशीताई लाटे आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App