ठाकरे गटाची मुख्यमंत्रीपदाची मागणी “जाहीर” वरून “भिंतीआड” आली; मग पुन्हा रंगणार का बाळासाहेबांच्याच खोलीतली स्टोरी??

Thackeray Shivsena

नाशिक : ठाकरे गटाची मुख्यमंत्रीपदाची मागणी “जाहीर” वरून “भिंतीआड” आली. त्यामुळे पुन्हा एकदा बाळासाहेबांच्याच खोलीतली रंगणार का स्टोरी??, असा सवाल तयार झाला आहे. Thackeray Shivsena demands to secretly decide chief ministers name

कारण उद्धव ठाकरेंनी “मुख्यमंत्री आधी ठरवा”, ही जाहीरपणे केलेली मागणी काँग्रेस आणि शरद पवारांनी फेटाळली. त्याला आठवडा उलटून गेला, त्यानंतर आता ठाकरे गटाच्या नेत्यांनी निदान भिंतीआड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा, अशी मागणी केल्याची बातमी समोर आली आहे. आता या नव्या मागणीवर काँग्रेस आणि शरद पवार काय निर्णय घेणार??, याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे.

पण त्या पलीकडे जाऊन उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे केलेली मुख्यमंत्री ठरवण्याची मागणी, जर शरद पवार आणि काँग्रेस यांनी फेटाळली असेल, तर भिंतीआड मुख्यमंत्री ठरवून पवार आणि काँग्रेस नंतर तो भिंतीआड ठरवलेला मुख्यमंत्री जाहीरपणे तसाच्या तसा मान्य करतील का?? हा ही कळीचा सवाल उत्पन्न होणार आहे. किंबहुना त्यामुळेच 2019 पूर्वीची बाळासाहेबांच्या खोलीतली स्टोरी नव्याने रंगणार का??, याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे.

2019 ची स्टोरी

2019 मध्ये शिवसेना – भाजप महायुतीने एकत्रित निवडणूक लढवली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी तसेच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी जाहीरपणे देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री होतील, असे सांगितले होते. उद्धव ठाकरेंनी कुठल्याही जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाला तेव्हा विरोध केला नव्हता.


ADR report : ADRचा अहवाल- देशातील 151 लोकप्रतिनिधींवर महिलांविरुद्ध गुन्ह्यांचा आरोप; राज्यांमध्ये पश्चिम बंगालच्या खासदार-आमदारांविरुद्ध सर्वाधिक खटले


परंतु 2019 चे निकाल लागले. महायुतीला 161 जागा मिळाल्या. भाजपला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आणि त्यानंतर “कळ” फिरली. उद्धव ठाकरेंना “अचानक” बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शाह यांनी दिलेला “शब्द” आठवला. “सत्तेचे समान वाटप” याचा अर्थ अडीच – अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद असा सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाला हात घातला. भाजपची कोंडी केली. नंतर उघडपणे काँग्रेस आणि शरद पवारांची हातमिळवणी करून मुख्यमंत्रीपद खेचले. भाजपला विरोधी पक्षात बसवले.

ही सगळी स्टोरी अडीच वर्षे रंगली. त्यावर मोठी पुस्तके लिहिली गेली, पण उद्धव ठाकरेंना अमित शाह यांनी बाळासाहेबांच्या खोलीत खरंच मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता का?? तो दिला असल्यास त्यांनी तो पाळला का नाही?? देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील हे सगळे नेते सातत्याने बोलत का राहिले??, हे सवाल त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आजतागायत तरंगत राहिले. त्याची खरी उत्तरे कोणाकडूनच मिळाली नाहीत.

 पवार आणि काँग्रेसची गॅरंटी कोण देणार??

मग आता “मुख्यमंत्री आधी ठरवा” ही उद्धव ठाकरेंची मागणी शरद पवार आणि काँग्रेस यांनी जर जाहीरपणे फेटाळली आहे, तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष निदान “भिंतीआड” तरी मुख्यमंत्री ठरवा, अशी मागणी का करतो आहे?? उद्धव ठाकरेंची ही नवी मागणी पवार आणि काँग्रेस मान्य करणार का?? आणि समजा ती मागणी मान्य केली आणि भिंतीआड मुख्यमंत्री ठरविला, तरी तो निवडणुकीच्या निकालानंतर जाहीरपणे जसाच्या तसा मान्य करतील का?? पवार आणि काँग्रेस यांची खात्री कोण देणार??, हे कळीचे सवाल या निमित्ताने तयार झाले आहेत. किंबहुना बाळासाहेबांच्याच खोलीतली पुढची स्टोरी निवडणुकीनंतर रंगण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे

Thackeray Shivsena demands to secretly decide chief ministers name

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात