Sharad Pawar : शिंग मोडून वासरात, शरद पवार एमपीएससी आंदोलनात

विशेष प्रतिनिधी

पुणे : विदयार्थी आंदोलनात राजकीय पोळी भाजण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केली आहे. काल रोहित पवार यांनी आंदोलनात भेट देऊन ग्राऊंड तयार केल्यावर आता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा दिला आहे.

मागच्या तीन दिवसांपासून एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. परवा दिवशी रात्रीपासून हे विद्यार्थी पुण्यातील शास्त्री रोडवर आंदोलन करत आहेत. राज्यसेवा आयोग आणि आयबीपीएसचा परिक्षा एकाच दिवशी असल्याने त्याची तारीख बदलण्यात यावी तसंच कृषी विभागाच्या जागा राज्यसेवा आयोगात समाविष्ट करण्याची मागणी या विद्यार्थ्यांची आहे. मागण्या मान्य होत नाहीत तोवर आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा शरद पवारांनी दिला आहे. ते आज या आंदोलनस्थळी भेट देणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे या आंदोलनात सहभागी झालेत.

शरद पवार यांनी ट्विट करत या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात शरद पवार सहभागी होणार आहेत. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार, असं ट्विट शरद पवारांनी केलं आहे.

एमपीएससी आयोग 25 तारखेची परीक्षा पुढे ढकलणार की वेळेतच परीक्षा होणार हे आज ठरणार आहे.

एमपीएससी विद्यार्थ्यांचे गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. राज्यसेवा आयोग आणि आयबीपीएसचा एकाच दिवशी पेपर आल्याने यातील एका पेपरची तारीख बदलण्यात यावी अशी आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी आहे. कृषी विभागाच्या जागा राज्यसेवा आयोगात समाविष्ट करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात येत आहे. तर आज याबाबत तोडगा निघाला नाही तर आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा शरद पवारांनी दिला आहे.

वास्तविक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत.तसेच कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे.बैठक घेऊन त्यात यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल, असे त्यांनी मला आश्वस्त केले आहे.

स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यावर आता शरद पवार यांनी यामध्ये उतरून श्रेय लाटण्याचा प्रयत्न चालविला असल्याची टीका होत आहे.

Sharad Pawar in Pune MPSC Student Protest

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात