Noida Mumbai and Gurugram : नोएडा, मुंबई आणि गुरुग्राममधील मॉलमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी!

Bomb threats at malls

पोलिसांनी तातडीने मॉल रिकामे करून कसून तपासणी केली, मात्र…


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीतील डीएलएफ मॉल, गुरुग्रामचा ( Gurugram )  ॲम्बियन्स मॉल आणि मुंबईच्या इनऑर्बिट मॉलमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. धमकी दिल्यानंतर तिन्ही मॉल रिकामे करून तपासणी करण्यात आली, मात्र काहीही निष्पन्न झाले नाही.

यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. डीएलएफ प्रोमेनेडमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली आणि मॉल रिकामा करण्यात आला, मात्र सुदैवाने कुठेही बॉम्ब नव्हता आणि कोणतीही दुर्घटना घडली नाही.



नोएडा येथील डीएलएफ मॉल ऑफ इंडियामध्ये बॉम्ब असल्याची बातमी मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मॉल रिकामा करण्यात आला. संपूर्ण मॉलची झडती घेण्यात आली आणि त्यानंतर हा मॉल जनतेसाठी खुला करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणावर दोन नोएडा पोलिस अधिकाऱ्यांची वेगवेगळी वक्तव्ये समोर आली आहेत. या भागाचे डीसीपी म्हणतात की ही सुरक्षा कवायत म्हणजेच मॉक ड्रिल होती. त्याच वेळी, क्षेत्राच्या जॉइंट सीपीचे म्हणणे आहे की नोएडामधील मॉलबाबत एक बनावट मेल आला होता, त्यामुळे संपूर्ण शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Bomb threats at malls in Noida Mumbai and Gurugram

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात