Bangladesh : बांगलादेशात 52 जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर 205 हल्ले; हजारो हिंदू आंदोलक रस्त्यावर; आता मोहम्मद युनूस यांना शांततेची उपरती!!

Bangladesh

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बांगलादेशात विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली जमाते इस्लामी, बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी आणि हिफाजत ए इस्लाम या जिहादी संघटनांनी हिंसाचाराचा धुडगूस घालून शेख हसीना यांना बांगलादेशातून हाकलून देत सत्ता हस्तगत केली. अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस यांना बसवले. Mohammed yunus now rejects violence against Hindus in Bangladesh

परंतु बांगलादेशातला हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन यांच्या विरोधातला हिंसाचार थांबला नाही. मोहम्मद युनूस यांच्ये सरकारला तो आटोक्यात देखील आणता आला नाही. बांगलादेशात आतापर्यंत 52 जिल्ह्यांमध्ये हिंदूंवरील हल्ल्याच्या 205 घटना घडल्या. हजारो घरे पेटली. शेकडो हिंदूंच्या हत्या झाल्या. शेकडो महिलांवर गुंडांनी बलात्कार केले, त्यानंतर आता बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांना हिंसाचाराचा निषेध करण्याची उपरती झाली.

मोहम्मद युनूस हे नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ असल्यामुळे त्यांना जागतिक पातळीवरची अधिमान्यता आहे. त्यामुळे त्यांचा चेहरा उदारमतवादी आहे, पण या उदारमतवादी चेहऱ्याने पॅरिसमध्ये असताना जेव्हा प्रत्यक्षात बांगलादेशात हिंदू विरोधात हिंसाचार घडत होता, हजारो हिंदूंच्या हत्या होत होत्या, हजारो घरे पेटत होती, तेव्हा हिंसाचाराचा निषेध केला नाही. अंतरिम सरकारची सूत्रे हातात घेताना देखील हिंसाचाराबद्दल “ब्र” शब्द काढला नाही, पण आता जेव्हा देशातल्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पूर्णपणे अंगावर आल्यानंतर मात्र मोहम्मद युनूस या उदारमतवादी नोबेल प्राप्त अर्थशास्त्रज्ञ राज्यकर्त्याला बांगलादेशात शांतता निर्माण व्हायला पाहिजे, असे आवाहन करण्याची उपरती झाली. त्यामुळेच मोहम्मद युनूस हे लिबरल डीप स्टेटचे हस्तक असल्याचे सिद्ध झाले.

मोहम्मद युनूस म्हणाले :

अल्पसंख्याकांवरील हल्ले हा एक घृणास्पद गुन्हा आहे. बांगलादेशात राहणाऱ्या हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध समाजातील लोकांचे रक्षण करणे हे देशातील तरुणांचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांनी या देशाला वाचविले आहे. ते अल्पसंख्याकांचे रक्षण करू शकत नाहीत का?? तेही आपल्या देशाचे नागरिक आहेत. आपल्याला एकत्र राहायचे आहे.

बांगलादेशात हजारो हिंदूंची निदर्शने

शनिवारी हजारो हिंदू निदर्शकांनी ढाका आणि चितगावमध्ये रस्ते अडवले. त्यांनी त्यांच्या घरांवर, दुकानांवर आणि मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला. यावेळी आंदोलकांनी ‘हिंदूंचे रक्षण करा’, ‘आम्हाला न्याय हवा’, ‘देश सर्व नागरिकांचा आहे’ अशा घोषणाही दिल्या. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पक्ष अवामी लीगच्या दोन हिंदू नेत्यांची हत्या का केली??, असा जाब आंदोलकांनी विचारला.

अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र मंत्रालय

बांगलादेशातील आंदोलकांनी हिंदूंवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची मागणी केली. अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणीही त्यांनी केली. बांगलादेशच्या संसदेत त्यांना 10 % जागा द्याव्यात, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

हिंदू समुदायावरील हिंसाचाराचा निषेध केवळ बांगलादेशपुरता मर्यादित नाही. हिंदूंवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ब्रिटनच्या संसदेच्या सभागृहाबाहेरही मोठ्या संख्येने लोक जमले होते. त्यांनी ‘हिंदू लाइफ मॅटर्स’च्या घोषणा दिल्या. मानवाधिकार संघटनांच्या सदस्यांसह अनेक लोक या निदर्शनात सहभागी झाले होते.

आंदोलकांनी हिंसाचारात बाधित झालेल्यांना भरपाई देण्याची मागणीही केली. याशिवाय मोडकळीस आलेली मंदिरे पुन्हा बांधण्याची मागणीही करण्यात आली. या देशात जन्माला आल्याचे आंदोलकांनी सांगितले. ही त्यांच्या पूर्वजांची भूमी आहे. हा देशही तितकाच त्यांचा आहे. त्याला इथे मारलं तरी तो आपली जन्मभूमी बांगलादेश सोडणार नाही. हक्क मिळवण्यासाठी ते रस्त्यावर उतरणार आहेत.

बांगलादेशची लोकसंख्या 17 कोटी आहे, त्यात हिंदूंची संख्या 7.95 % (1.35 कोटी) आहे. हिंदू धर्म हा बांगलादेशातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे. देशातील 64 पैकी 61 जिल्ह्यांमध्ये हिंदूंची मोठी लोकसंख्या आहे. वृत्तानुसार बांगलादेशातील हिंदूंना हसीना यांच्या पक्ष अवामी लीगचे समर्थक मानले जाते. यामुळेच त्यांना जमाते इस्लामी आणि बाकीच्या जिहादी संघटनांनी टार्गेट केले.

बांगलादेश हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन एकता परिषदेनुसार, देशातील 64 पैकी 52 जिल्ह्यांमध्ये हिंदू आणि त्यांच्या मालमत्तांना लक्ष्य करण्यात आले. परिषदेने म्हटले आहे की, अल्पसंख्याकांना भीतीच्या वातावरणात जगावे लागत आहे.

Mohammed yunus now rejects violence against Hindus in Bangladesh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात