जितेंद्र आव्हाडांना कळवा – मुंब्य्रात 8 माजी नगरसेवकांचा धक्का; पण त्यांना “चिंता” योगी – शाह यांच्यात बिनसल्याची!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कळवा – मुंब्रा मतदारसंघाचे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्याच समर्थक 8 नगरसेवकांनी धक्का दिला, पण त्यांना सावरून पवारांच्याच राष्ट्रवादीत खेचून धरण्याऐवजी जितेंद्र आव्हाड यांना “चिंता” लागून राहिली आहे, ती योगी आणि शाह यांच्यात बिनसल्याची!! Report to Jitendra Awhad – Shock of 8 former corporators in Mumbai

कळवा – मुंब्रा परिसरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 8 माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला. अजितदादांनी त्यापैकी अनेक पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नेमणुका करून टाकल्या. यानिमित्ताने अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाड यांना जोरदार धक्का दिला. पण या नगरसेवकांना पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खेचून धरण्यात जितेंद्र आव्हाड यांना अपयश आले.

अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी मंगळवारी रात्री हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी कळव्यातील माजी विरोधी पक्षनेते प्रकाश बर्डे, नगरसेविका रिटा यादव, परिवहन समिती सदस्य तकी चेऊलकर, समाजसेवक राजनाथ यादव आणि मुंब्र्यातील नगरसेविका रुपाली गोटे, नगरसेविका आशरीन राऊत, समाजसेवक इब्राहिम राऊत, नगरसेवक शेख जफर नोमानी, नगरसेविका हफिजा नाईक, समाजसेविका नेहा नाईक, समाजसेवक काफील शेख, नगरसेविका अन्सारी साजिया परवीन सर्फराज, समाजसेवक राजू अन्सारी, समाजसेवक सर्फराज अन्सारी, नगरसेविका हसीना अब्दुल अजीज शेख, समाजसेवक अजीज शेख, मुमताज शाह, मेहफूज (मामा) शेख, सय्यद शमविल यांनी पक्ष प्रवेश केला.

शेख जाफर नोमानी यांची मुंब्रा-कळवा विधानसभा अध्यक्ष पदी, मुमताज शाह यांची जिल्हा सरचिटणीस, मुंब्रा-कळवा प्रवक्ते पदी, मेहफूज (मामा) शेख यांची शीळ डायघर ब्लॉक अध्यक्ष पदी, सय्यद शमवील याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंब्रा-कळवा विधानसभा अध्यक्षपदी अजितदादांनी नियुक्ती केली.

एवढे सगळे घडत असताना जितेंद्र आव्हाड गेले 5 – 6 दिवस काही करू शकले नाहीत. पवारांच्या राष्ट्रवादीला आपल्याच विधानसभा मतदारसंघात झालेले डॅमेज रोखू शकले नाहीत.

पण आज मात्र आव्हाडांनी भाजपच्या मुख्यमंत्री परिषदेतला एक ग्रुप व्हिडिओ शेअर करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात काय बिनसलेय??, असा तथाकथित खोचक सवाल करणारे ट्विट केले. त्यामुळे आव्हाड यांना स्वतःचा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे डॅमेज रोखता आले नाही, पण ते भाजपमधल्या कथित मतभेदांकडे बोट दाखवत आहेत, यातल्या विसंगतीमुळे सोशल मीडियात अनेकांनी आव्हाड यांची खिल्ली उडवली आहे.

Report to Jitendra Awhad – Shock of 8 former corporators in Mumbai

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात