आसाम सरकारचा मोठा निर्णय, मुस्लिम विवाह कायदा रद्द!

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ‘एक्स’वर दिली माहिती Big decision of Assam government Muslim marriage law canceled

विशेष प्रतिनिधी

आसाम  : आसाम सरकारने आज मोठा निर्णय घेत मुस्लिम विवाह कायदा रद्द केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली. “आम्ही आमच्या मुली आणि बहिणींना न्याय मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे आणि बालविवाहा विरूद्ध अतिरिक्त सुरक्षा उपाय सुरू केले आहेत.” असे त्यांनी X वर एका पोस्टमध्ये लिहिले आहे.

आज आसाम मंत्रिमंडळाच्या बैठकीत, आम्ही Assam Repealing Bill 2024 द्वारे आसाम मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा आणि नियम 1935 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अशीही माहिती मुख्यमंत्री सरमा यांनी दिली आहे.

हे विधेयक आसाम विधानसभेच्या पुढील पावसाळी अधिवेशनात विचारार्थ ठेवण्यात येणार आहे. आसाम मंत्रिमंडळाने राज्यात मुस्लिम विवाहांच्या नोंदणीसाठी कायदा आणण्याचे निर्देश दिले आहेत. विधानसभेच्या पुढील अधिवेशनात यावर विचार केला जाईल.

Big decision of Assam government Muslim marriage law canceled

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात