विशेष प्रतिनिधी
लखनौ : श्रावण महिन्यातील कावड यात्रेत फेक नावांनी दुकाने लावून शॉपिंग जिहाद करणाऱ्यांना उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने चाप लावताच “पुरोगामी” लेखक गीतकार जावेद अख्तर खवळले आणि त्यांनी योगी सरकारची तुलना हिटलरशी केली. असदुद्दीन ओवैसी आणि अखिलेश यादव साथीला आले. Muzaffarnagar UP police has given instructions that on the route of a particular religious procession in near future all the shops restaurants
याची कहाणी अशी :
श्रावण महिन्याची सुरुवात ही कावड यात्रेने केली जाते. उत्तर प्रदेशात या कावड यात्रेची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच मुजफ्फरनगर पोलीस प्रशासनाने एक सूचना लागू केली आहे, की ज्यावरुन आता वाद रंगला आहे. या वादात सुप्रसिद्ध कवी, गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनीही उडी घेतली आहे. उत्तर प्रदेशातले पोलीस नाझी लोकांसारखे वागत आहेत असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी ही सूचना दिली आहे की कावड यात्रेच्या मार्गात जी दुकानं आहे त्या दुकानांच्या पाटीवर दुकानदाराने त्याचं नाव लिहावं, असे निर्देश दिले आहेत.
Muzaffarnagar UP police has given instructions that on the route of a particular religious procession in near future all the shops restaurants n even vehicles should show the name of the owner prominently and clearly . Why ? . In Nazi Germany they used to make only a mark on… — Javed Akhtar (@Javedakhtarjadu) July 18, 2024
Muzaffarnagar UP police has given instructions that on the route of a particular religious procession in near future all the shops restaurants n even vehicles should show the name of the owner prominently and clearly . Why ? . In Nazi Germany they used to make only a mark on…
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) July 18, 2024
नाव लिहिल्याने दुकान हिंदूंचे आहे की मुस्लिमांचे हे समजू शकणार आहे. अर्थातच कावड यात्रेतले भाविक हे मुस्लिम व्यक्तींच्या दुकानातून सामान खरेदी करणार नाहीत. त्यामुळे फेक नावाने शॉपिंग जिहाद चालविणाऱ्यांना चाप बसेल. पण यामुळेच जावेद अख्तर भडकले. मुजफ्फर नगर प्रशासनाने दिलेल्या या निर्देशानंतर असदुद्दीन ओवैसींचाही संताप झाला आहे. तसंच जावेद अख्तर यांनी तर उत्तर प्रदेश पोलिसांची तुलना हिटलरच्या नाझींशी केली आहे.
जावेद अख्तर यांची पोस्ट
मुजफ्फर नगरच्या पोलिसांनी जे निर्देश दिले आहेत की विशिष्ट धार्मिक समुदायाच्या मार्गातील सगळ्या दुकानांवर आणि रेस्तराँवर तसंच वाहनांवर त्यांच्या मालकांची नावं लिहावीत. हे कशासाठी?? जर्मनील नाझी लोक अशाच प्रकारे ज्यूंच्या घरांवर खूण करुन जायचे. दुसरीकडे एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही या निर्णयावर टीका केली. जावेद अख्तर यांनी जी पोस्ट केली आहे ती चांगलीच चर्चेत आहे.
ओवैसी यांची टीका
उत्तर प्रदेश पोलिसांच्या नव्या आदेशांनुसार आता प्रत्येक दुकानदाराला , खासगी गाडी किंवा ठेला चालवणाऱ्याला, वाहन चालकाला त्याचं नाव त्याच्या दुकानावर, ठेल्यावर, गाडीवर लावावं लागणार आहे. कावड यात्रेतले भाविक मुस्लिमांकडून चुकूनही काही घेऊ नयेत यासाठी हे निर्देश आहेत. हिटलरच्या जर्मनीत याला जुडेन बॉयकॉट म्हटलं जात होतं. तर दक्षिण अफ्रिकेत हा प्रकार अपारथाइड नावाने प्रचलित होता.
अखिलेश यांचीही योगी सरकारवर टीका
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही या निर्णयावरुन योगी सरकारवर टीका केली आहे. ज्या कुणाचं नाव गुड्डू, मुन्ना, छोटू असेल त्याच्या नावावरुन काय समजणार आहे??, असा खोचक प्रश्न अखिलेश यादव यांनी केला. या प्रकरणाची दखल न्यायालयाने घेतली पाहिजे. यामागे सरकारचा उद्देश नेमका काय? याची माहिती घ्यावी तो चुकीचा असेल तर या प्रकरणात कारवाई झाली पाहिजे. अशा प्रकारचे आदेश हे सामाजिक अपराध आहेत. समाजातील समता आणि बंधुता बिघडवण्यासाठी दिलेले आदेश आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App