वृत्तसंस्था
हैदराबाद : अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचा भाऊ अमन प्रीत सिंग याला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अमनसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये नायजेरियातील एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. तेलंगणा अंमली पदार्थ विरोधी विभागाने त्यांच्याकडून हैदराबाद येथे विक्रीसाठी आणलेले 199 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे.Actress Rakul Preet’s brother arrested in drug case; 5 people including Aman shackled in Hyderabad
सायबराबाद पोलिसांच्या राजेंद्र नगर झोनचे डीसीपी श्रीनिवास यांनी सांगितले की, पोलिसांनी एका फ्लॅटवर छापा टाकून 5 जणांना अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून 2 पासपोर्ट, 10 मोबाईल फोन आणि 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्वांच्या लघवीच्या नमुन्याची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मेडिकलनंतर पाचही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ड्रग रॅकेटचा म्होरक्या नायजेरियन नागरिक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज रॅकेटचा म्होरक्या नायजेरियन नागरिक डिव्हाईन इबुका सुजी आहे. तो अद्याप फरार आहे. तथापि, त्याचा मुख्य सहकारी आणि महिला ड्रग्ज तस्कर ओनुओहा ब्लेसिंग याला अटक करण्यात आली आहे.
अमनप्रीतसह अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे अनिकेत रेड्डी, प्रसाद, मधुसूदन आणि निखिल दमन अशी आहेत. हे सर्व व्यापारी आहेत. त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणात अमन प्रीत सिंगसह एकूण 13 जणांची नावे आहेत.
अमन प्रीत हा व्यवसायाने साऊथ सिनेमाचा अभिनेता
ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अमनप्रीत सिंगचा जन्म 1 एप्रिल 1993 रोजी झाला होता. त्याच्या कुटुंबात आई कुलविंदर आणि वडील राजेंद्र सिंग यांचा समावेश आहे. तो साऊथ सिनेसृष्टीतील अभिनेता आहे. तो 2022 मध्ये रामराज्य आणि निन्ने पेल्लादुत्ता या चित्रपटांमध्ये दिसलाय.
बहीण रकुल प्रीतसोबत टॅलेंट कंपनी चालवतो
अमन त्याची बहीण रकुलसोबत स्टारिंग यू नावाचे टॅलेंट डिस्कवरी प्लॅटफॉर्म चालवतो. प्लॅटफॉर्म कलाकारांना निर्माते, सामग्री निर्माते आणि वितरकांशी जोडते. 2022 मध्ये एका टीव्ही मुलाखतीत, अमनने सांगितले होते की त्याला एक अशी इकोसिस्टम तयार करायची आहे, जी टॅलेंटसाठी वन-स्टॉप डेस्टिनेशन म्हणून काम करेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App