सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांची नाबाद धडाकेबाज खेळी IND vs ZIM Team India beat Zimbabwe one way, win the match by 10 wickets
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने अप्रतिम खेळ दाखवत चौथ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेचा एकतर्फी पराभव केला. हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात झिम्बाब्वेने भारताला 153 धावांचे लक्ष्य दिले होते, जे टीम इंडियाने 16 व्या षटकातच पूर्ण केले आणि 10 विकेट्सने मोठा विजय नोंदवला. सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी नाबाद राहताना संघाला विजयाकडे नेले.
झिम्बाब्वेने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत 153 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण, भारतीय संघाने हे लक्ष्य 16 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एकही गडी न गमावता पूर्ण केले. यशस्वी जैसवालने 175.47 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 53 चेंडूत 93 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचवेळी दुसऱ्या टोकाकडून शुभमन गिलने 39 चेंडूत 58 धावांची नाबाद खेळी केली. अशाप्रकारे भारताने एकतर्फी 15.2 षटकांत लक्ष्य गाठले आणि सामना 10 गडी राखून जिंकला.
टीम इंडियाने चौथ्या T-20 सामन्यात झिम्बाब्वेचा पराभव करत मोठा विजय मिळवला आहे. यासह, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील पुढचा आणि शेवटचा सामना 14 जुलै रोजी हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये होणार आहे.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यात यशस्वी जैस्वालने अप्रतिम खेळी केली. त्याने 53 चेंडूत 93 धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने 2 षटकार आणि 13 चौकार मारले. यशस्वी भलेही शतक हुकले असेल, पण त्याच्या खेळीने चाहत्यांचे खूप मनोरंजन केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App