पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात द्विपक्षीय बैठक पार पडली
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात शनिवारी दिल्लीत द्विपक्षीय बैठक झाली. ज्यामध्ये अनेक करारांवर शिक्कामोर्तब झाले. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे हैदराबाद हाऊसमध्ये जोरदार स्वागत केले.Digital, health, medicine, blue economy agreements between India and Bangladesh sealed!
द्विपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या एका वर्षात आम्ही दहा वेळा भेटलो आहोत पण आजची बैठक विशेष आहे. कारण पंतप्रधान शेख हसीना आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील आमच्या पहिल्या राजकीय पाहुण्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “‘आमच्या नेबरहुड फर्स्ट पॉलिसी, ऍक्ट ईस्ट पॉलिसी, व्हिजन सागर आणि इंडो-पॅसिफिक व्हिजनच्या संगमावर बांगलादेश वसलेला आहे. गेल्या एका वर्षात आम्ही लोककल्याणासाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण केले आहेत.
दोन्ही देशांत भारतीय रुपयात व्यापार सुरू झाला आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यान गंगा नदीवरील जगातील सर्वात लांब नदीचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली क्रॉस-बॉर्डर मैत्री पाइपलाइन पूर्ण झाली आहे, जी भारतीय ग्रीडद्वारे बांगलादेशसाठी ऊर्जा क्षेत्रातील उप-प्रादेशिक सहकार्याचे पहिले उदाहरण बनली आहे. एवढा मोठा उपक्रम केवळ एका वर्षात अनेक क्षेत्रात राबविणे हे आमच्या संबंधांची गती आणि प्रमाण दर्शवते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारत बांगलादेशातून उपचारासाठी भारतात येणाऱ्या लोकांसाठी ई-वैद्यकीय व्हिसा सुविधा सुरू करणार आहे. आम्ही उत्तर बांगलादेशातील लोकांच्या सोयीसाठी रंगपूरमध्ये जे बांगलादेशचे पश्चिमी क्षेत्र आहे, तिथे नवीन सहाय्यक उच्चायुक्तालय उघडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बांगलादेश भारताचा सर्वात मोठा विकास भागीदार आहे. तसेच मी दोन्ही संघांना क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो असंही मोदींनी म्हटलं आहे.
याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, “आम्ही कनेक्टिव्हिटी, वाणिज्य आणि सहकार्य यावर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या 10 वर्षात आम्ही 1965 पूर्वी अस्तित्वात असलेली कनेक्टिव्हिटी पुर्नसंचयित केली आहे. आता आम्ही डिजिटल आणि ऊर्जा कनेक्टिव्हिटीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे ऊर्जा वाढीस चालना मिळेल. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था सीईपीएवर चर्चा करण्यास तयार आहेत. 54 नद्या भारत आणि बांगलादेशला जोडतात – आम्ही पूर व्यवस्थापन, पूर्व चेतावणी आणि 1996 च्या गंगा पाणी कराराच्या नूतनीकरणावर तांत्रिक स्तरावरील चर्चा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशातील तीस्ता नदीच्या संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी एक तांत्रिक चमू लवकरच बांगलादेशला भेट देणार आहे.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App