विशेष प्रतिनिधी
मुंबई : ओबीसी समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या आमदारांना विधानसभा निवडणुकीत ‘चुन चुन के गिराएंगे’ असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगेसोयरेचा जीआर काढलात तरी आगामी निवडणुकीत त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. Prakash Shendge warns, MLAs opposed to OBC reservation will be sacked
दरम्यान, प्रकाश शेंडगे पुढे बोलताना म्हणाले की, राज्य सरकार हे ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष करत आहे. या मुद्द्यावरुन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी सरकारची आहे. राज्य सरकारकडून आम्हाला ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही कोणत्याही बैठकीला जाणार नाही. ओबीसी उपोषणाचा हा वणवा राज्यभरात पेटेल. ओबीसी आरक्षणावरून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्व जबाबदारी सरकारची असेही त्यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी, राज्य सरकार ओबीसी समाजाला दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी नुकताच केला होता. राज्यात आता कुठे छोट्या छोट्या घटकांना प्रतिनिधित्व भेटत आहे. त्यांच्या हक्काचे आरक्षण संरक्षित करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय. शासन पोलिसांच्या मदतीने आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. ओबीसी समाजाकडून यापूर्वी तीन आंदोलन करण्यात आली. मात्र, शासनाने याची साधी दखल देखील घेतली नाही, याचे आम्हाला दुःख असून शासन ओबीसींना दुय्यम वागणूक देते. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून कोणत्याही परिस्थितीत उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा लक्ष्मण हाके यांनी घेतला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करत लक्ष्मण हाके यांना ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही याची ग्वाही दिली. मात्र, आपल्याला याबाबत लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली. आता ही मागणी राज्य सरकार मान्य करणार का, हे पाहावे लागेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App