Loksabha 2024 results :दक्षिणेतून दिग्विजय मिळवण्याऐवजी उत्तर प्रदेश, महाराष्ट्रानेच चित्र फिरवले; मोदींच्या सर्वसमावेशक हिंदुत्वाला जातीय राजकारणाचा छेद!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली अबकी बार 400 पार ही घोषणा भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमताची नौका पार करून घेऊन गेली, पण दक्षिणेतून दिग्विजय मिळण्याऐवजी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानेच लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र फिरवून टाकले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्व समावेशक हिंदुत्वाला जातीय राजकारणाने छेद दिल्याचे निकालाच्या सुरुवातीच्या कलांमधून दिसून आले. Modi’s inclusive Hinduism intersected with caste politics

पंतप्रधान मोदींनी अबकी बार 400 पार ही घोषणा देताना दक्षिणेतली राज्य आपल्याला हात देतील, अशी अटकळ बांधली होती. ते त्यांनी अनेक मुलाखतींमधून सांगितले होते. प्रत्यक्षात दक्षिणेतल्या राज्यांमधून भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला हात मिळाला, पण तो पुरेसा पडला नाही. त्या उलट उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन मोठ्या राज्यांमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही, तर मोठा फटका बसला.

उत्तर प्रदेशात सकाळी 11.00 वाजेपर्यंतच्या कलांमध्ये 36 ठिकाणी भाजप तर 34 ठिकाणी समाजवादी पार्टी आणि 7 ठिकाणी काँग्रेस आघाडीवर होती. याचा अर्थच उत्तर प्रदेशामध्ये भाजपला एकतर्फी वाटणारी निवडणूक फिरली. बहुजन समाज पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवून मतांमध्ये फार मोठी फूट न पडता समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्या युतीने भाजपला जोरदार टक्कर दिली. समाजवादी पार्टी “इंडिया” आघाडीचा घटक पक्ष असली तरी त्यांनी पिछडा + दलित + आदिवासी अर्थात पीडीए हा फॉर्म्युला देखील चालवला. तो फॉर्मुला चालवून त्यांना चालवताना अखिलेश यादव यांचा भाजपच्या विशेषत: नरेंद्र मोदींच्या सर्वसमावेशक हिंदुत्वाला छेद देण्याचा इरादा होता, त्यामध्ये ते बऱ्याच अंशी यशस्वी झाले.

– महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जोरदार टक्कर

महाराष्ट्रात महायुतीचे सर्वसमावेशक राजकारण करण्यास करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना शरद पवार यांच्यापासून फोडून महायुतीत घेतले. एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंपासून बाजूला करून त्यांना मुख्यमंत्री केले, पण लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांच्या चाणक्यगिरीपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचा कौल वेगळा गेला.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना महाराष्ट्राच्या जनतेची सहानुभूतीची मते मिळाली. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप या युतीचे हिंदुत्वाचे राजकारण महाराष्ट्राच्या जनतेने जेवढे स्वीकारले, तेवढे अजित पवारांना महायुतीत घेतल्याचे राजकारण जनतेने नाकारले, हाच या निवडणुकीतला अधोरेखित संदेश ठरला.

Modi’s inclusive Hinduism intersected with caste politics

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात