इंडी आघाडीच्या नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांचा घेतला समाचार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मुझफ्फरपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी इंडी आघाडी आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. In Bihar’s Muzaffarpur Prime Minister Modi mentioned Pakistan and criticized the India Alliance
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही देशाची निवडणूक आहे, ही भारताचे भविष्य ठरवण्याची निवडणूक आहे, ही निवडणूक देशाचे नेतृत्व निवडण्याची निवडणूक आहे. देशाची धुरा कोणाच्या हातात द्यायची हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. देशाला कमकुवत, घाबरट आणि अस्थिर काँग्रेस सरकार अजिबात नको आहे.
मोदी म्हणाले की, हे लोक इतके घाबरले आहेत की त्यांना रात्री स्वप्नातही पाकिस्तानचा अणुबॉम्ब दिसतो. आता अशा पक्षांच्या आणि नेत्यांच्या हाती देश सोपवता येईल का ज्यांना रात्री झोपेतही पाकिस्तानचा अणुबॉम्ब दिसतो? पाकिस्तान बांगड्या घालत नाही, अशी इंडी आघाडीच्या नेत्यांकडून विधानं येतात, मात्र मी त्यांना सांगेन आम्ही त्यांना बांगड्या घालू, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले की त्यांना पिठाची गरज आहे, त्यांच्याकडे वीजही नाही, अहो, त्यांच्याकडे बांगड्याही नाहीत हे आम्हाला माहीत नाही. पंतप्रधान पुढे म्हणाले की, मुंबई हल्ल्यात पाकिस्तानला कोणीतरी क्लीन चिट देत आहे. कोणी सर्जिकल आणि एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करत आहे. या डाव्यांना फक्त भारताची अण्वस्त्रे संपवायची आहेत. असं दिसतय की इंडी आघाडीने भारताविरोधातच सुपारी घेतली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App