काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिला नाही म्हणून नसीम खानांची नाराजी, पण ओवैसींच्या AIMIM ने केली त्यांची गोची!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसने महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही म्हणून मुंबईतले काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठा राजकीय वाद उभा राहिला, पण त्याचवेळी AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी नसीम खान यांची पुरती गोची केली. त्यांना AIMIM पक्षात घेऊन त्यांच्या पसंतीच्या लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्याची घोषणा करून टाकली. त्यामुळे आपल्या नाराजी वर खुलासा देताना नसीम खान यांचे पंचाईत झाली. Nassem Khan upset over ticket distribution in Congress, but AIMIM exposed his plank

काँग्रेसने मुंबईतून वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी उसळली. त्यातून नसीम खान यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे काँग्रेस अंतर्गत मोठी खळबळ उडाली. काँग्रेस आणि महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांनी एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मुस्लिमांची मते हवी आहेत, पण मुस्लिम उमेदवार नको आहे. मुस्लिम समाज हे सहन करणार नाही, अशा शब्दांमध्ये नसीम खान यांनी काँग्रेसचे वाभाडे काढले.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गोहाटीत नसीम खान यांच्या वक्तव्याची दखल पण घेतली. ते एक लढवय्या कार्यकर्ते आहेत. त्यांची नाराजी समजू शकतो. त्यांना किंवा एखाद्या मुस्लिम नेत्याला राज्यसभा किंवा अन्यत्र सामावून घेता येऊ शकेल, असा खुलासा मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

पण नसीम खान यांची खरी गोची AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली. नसीम खान यांनी काँग्रेसला लाथ मारावी. आमच्या पक्षात येऊन त्यांच्या पसंतीचा मतदार संघ निवडावा आणि लोकसभेला उभे राहावे आणि त्यांच्या उमेदवारीसाठी मोठी यंत्रणा उभी करून प्रचार करू, अशी ऑफर ओवैसी यांनी नसीम खान यांना दिली. मात्र ही ऑफर नाकारताना नसीम खान यांची दमछाक झाली. मी काँग्रेसच्या कट्टर कार्यकर्ता आहे. काँग्रेस हायकमांडवर माझी नाराजी नाही. काँग्रेस आणि महाविकास आघाडीला अल्पसंख्यांकांची मते हवी आहेत, पण अल्पसंख्यांक उमेदवार नको आहे, एवढेच माझे म्हणणे आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी हेच माझे नेते आहेत. मी लवकरच त्यांची भेट घेऊन माझ्या तक्रारी त्यांच्या कानावर घालणार आहे, असे नसीम खान यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

पण नसीम खान यांनी मुस्लिम उमेदवाराच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त करून काँग्रेसमध्ये खळबळ माजवली खरी, पण त्याहीपेक्षा असदुद्दीन ओवैसी यांनी नसीम खान यांची गोची करून त्यांच्या मुद्द्यातली हवा काढून घेतली. उलट नसीम खान यांना जास्त आवाज न करता गांधी परिवाराचे नेतृत्व मान्य करत असल्याचे जाहीर करावे लागले.

Nassem Khan upset over ticket distribution in Congress, but AIMIM exposed his plank

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात