कानपूरमधील काँग्रेस उमेदवाराविरोधात पोलिसांनी दाखल केला 420चा गुन्हा!

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण; काँग्रेस उमेदवारावर एका महिन्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. Police registered 420 crime against Congress candidate in Kanpur

विशेष प्रतिनिधी

भारतात २०२४ च्या लोकसभा निवडणुका सुरू झाल्या आहेत. विविध राजकारणी आपापल्या तयारीत व्यस्त आहेत. दरम्यान, कानपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारावर मोठा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेसचे उमेदवार आलोक मिश्रा यांच्याविरोधात पोलिसांनी कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आलोक मिश्रा यांच्यावर आचारसंहितेच्या काळात रुग्णवाहिकेचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिकेचा गैरवापर केल्याप्रकरणी आलोक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता भंग झाल्याने पोलीस तपास करत होते. यावेळी त्यांनी एका रुग्णवाहिकेतून विरोधी पक्षनेत्यांची पोस्टर्स आणि बॅनर जप्त केले होते. रुग्णवाहिकेत बसलेल्या लोकांना विचारणा केली असता हे निवडणूक प्रचार साहित्य काँग्रेस उमेदवाराचे असल्याचे आढळून आले.

निवडणूक प्रचाराचे साहित्य रुग्णवाहिकेत नेणे अयोग्य असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. रुग्णांची ने-आण करण्यासाठी या वाहनाचा वापर केला जातो. या प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आलोक यांच्यावर एका महिन्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

कानपूरमधून उमेदवारी दाखल करतानाही आलोक मिश्रा यांचा पोलिसांशी वाद झाला. वास्तविक, पोलिसांनी आलोक मिश्रा यांना नामांकन कक्षात जाण्यापासून रोखले होते आणि पाचपेक्षा जास्त प्रस्तावक एकत्र जाऊ शकत नाहीत असे सांगितले होते. यावर आलोक म्हणाले की, मी प्रस्तावक नसून उमेदवार आहे. पोलिसांनी अडवल्याने संतापलेले आलोक मिश्रा रस्त्यावर उतरून आंदोलन करत बसले होते.

Police registered 420 crime against Congress candidate in Kanpur

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात