वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) ने हैदराबादस्थित कंपनी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. निवडणूक रोखे खरेदी करण्यात ही कंपनी दुसऱ्या क्रमांकावर होती. कंपनीने 966 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले होते. लाचखोरीशी संबंधित एका प्रकरणात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.FIR against another big company buying electoral bonds; CBI registered a case of bribery
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, एफआयआरमध्ये एनआयएसपी आणि एनएमडीसीच्या 8 अधिकाऱ्यांची आणि मेकॉनच्या दोन लोकांची नावे आहेत. मेघा इंजिनिअरिंगच्या जगदलपूर इंटिग्रेटेड स्टील प्लांटमधील कामाचे 174 कोटी रुपयांचे बिल पास करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी 78 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.
जगदलपूर इंटिग्रेटेड स्टील प्लांटमधील इंटेक वेल, पंप हाऊस आणि क्रॉस-कंट्री पाइपलाइनच्या कामाच्या 315 कोटी रुपयांच्या प्रकल्पात लाचखोरी उघड झाल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. एजन्सीने 10 ऑगस्ट 2023 रोजी प्राथमिक तपास सुरू केला होता. हा प्रकल्प मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकडे होता.
मेघा इंजिनिअरिंग ही निवडणूक रोख्यांची खरेदी करणारी दुसरी सर्वात मोठी कंपनी
निवडणूक आयोगाने 1 मार्च 2024 रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मेघा इंजिनिअरिंग ही निवडणूक रोख्यांची खरेदी करणारी दुसरी सर्वात मोठी कंपनी होती. कंपनीने भाजपला 586 कोटी रुपयांची देणगी दिली होती. कंपनीने BRS ला 195 कोटी रुपये, DMK ला 85 कोटी रुपये आणि VSRCP ला 37 कोटी रुपये दान केले होते. टीडीपीला कंपनीकडून सुमारे 25 कोटी रुपये मिळाले, तर काँग्रेसला 17 कोटी रुपये मिळाले. JD-S, जनसेना पक्ष आणि JDU यांना 5 कोटी ते 10 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात आली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App