वेल्लोरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल! Cannot expect development in Tamil Nadu under DMK rule PM Modi criticizes in Vellore
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तमिळनाडूत पोहोचले आहेत. मोदी तामिळनाडूतील वेल्लोर येथे निवडणूक रॅलीला संबोधित करत आहेत. यावेळी ते म्हणाले की, ब्रिटिश राजवटीत घडलेल्या क्रांतीसारखीच दुसरी क्रांती वेल्लोरमध्ये पाहायला मिळेल. एनडीएने गेल्या 10 वर्षांत चांगले काम करून विकसित भारताचा पाया घातला आहे.
मोदी म्हणाले की, 2014 पूर्वी भारताची अर्थव्यवस्था कमकुवत होती. या काळात कोणताही मोठा निर्णय झाला नाही. त्या काळात भारताकडे घोटाळ्यांचा देश म्हणून पाहिले जात होते. आज तामिळनाडूमध्ये एनडीएला प्रचंड जनसमर्थन मिळत आहे.
वेल्लोरच्या लोकांपर्यंत पोहोचून पंतप्रधान मोदींनी राज्यातील द्रमुक सरकारवरही जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, घराणेशाही पक्ष काँग्रेस आणि द्रमुक कधीही तामिळनाडूच्या आकांक्षा पूर्ण करू शकत नाहीत. मोदी म्हणाले की, जेव्हा देशाच्या संसदेत सेंगोलची स्थापना करण्यात आली तेव्हा द्रमुकने विरोध केला होता. द्रमुकच्या राजवटीत तामिळनाडूत विकासाची अपेक्षा करता येणार नाही, असे ते म्हणाले. राज्यात आज लुटीचा खुलेआम खेळ सुरू आहे. द्रमुकचे धोरण ‘फोडा आणि राज्य करा’ आहे. हा पक्ष भाषा, प्रांत, जात, धर्माच्या नावावर फूट पाडून राज्य करण्याचे काम करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App