साताऱ्यात पवारांचा डाव फिर फिर फिरला; शेवटी शशिकांत शिंदेंवरच आला!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : साताऱ्यात पवारांचा डाव फिर फिर फिरला शेवटी शशिकांत शिंदेंवरच आला!!, असे म्हणायची वेळ आली. कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांनाच उमेदवारी द्यावी लागली.Sharad pawar’s NCP gave ticket to shashikant shinde from satara loksabha constituency

सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीनिवास पाटील यांनी वयाचे कारण पुढे करून लोकसभा निवडणूक लढवायला नकार दिल्यानंतर पवारांची खूपच पंचाईत झाली होती. कारण त्यांना तिथून “तगडा” उमेदवारच मिळेनासा झाला होता. म्हणून सुरुवातीला पवारांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर डाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांना तुतारी चिन्हावर लोकसभेच्या मैदानात लढण्यासाठी “कन्व्हिन्स” करायचा प्रयत्न केला, पण पृथ्वीराज चव्हाण पवारांच्या डावात फसले नाहीत. ते पवारांचा डाव पुरता ओळखून बसले.



दरम्यानच्या काळात पवारांच्या राष्ट्रवादीतून शशिकांत शिंदे यांच्यासह सत्यजित पाटणकर सुनील माने वगैरे नावे चर्चेत राहिली, पण पवारांचा त्यापैकी कोणावरच भरवसा नव्हता. सातारा लोकसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत पाऊस पडला पवार त्यात भिजले त्यामुळे श्रीनिवास पाटलांना त्याचा लाभ होऊन ते निवडून आले. आता यावेळी तसा पाऊस पडण्याची शक्यता फारच कमी होती. त्यामुळे जो काही उमेदवार द्यायचा तो तगडाच द्यावा लागेल, याची पवारांना जाणीव होती, पण पवारांना “तगडा” उमेदवार सापडत नव्हता. म्हणूनच त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांवर प्रयोग करून पाहिला, पण तो प्रयोग फसला!!

त्याच काळात “पवार साताऱ्यातून नवा डाव टाकणार”, “चाणक्य खेळी करणार” वगैरे बातम्यांची मराठी माध्यमांनी भरमार केली, पण ही भरमार सगळी फोल गेली. कारण पवारांचा डाव साताऱ्यात फारसा चाललाच नाही, उलट तो डाव फिरला फिरला आणि शेवटी शशिकांत शिंदेंवरच आला. म्हणजे पवारांना साताऱ्यात शशिकांत शिंदे यांनाच उमेदवारी द्यावी लागली.

कोरेगावात पडलेले आमदार

शशिकांत शिंदे हे पवारांचे निष्ठावंत मानले जातात. त्यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 2009 मध्ये शालिनीताई पाटलांचा पराभव केला होता, पण 2014 पासूनच्या निवडणुकीत त्यांना शिवसेनेच्या महेश शिंदेंकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे शशिकांत शिंदे हे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात हरलेले आमदार आहेत. पण आता “सक्षम” उमेदवार सापडत नसल्याने पवारांना सातारा लोकसभा मतदारसंघात त्यांच्यावरच डाव टाकावा लागला आहे.

Sharad pawar’s NCP gave ticket to shashikant shinde from satara loksabha constituency

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात