जळगावच्या भाजप खासदार उन्मेश पाटलांना शिवसेनेत घेऊन ठाकरेंची दुसरी यादीही आली; पण पवारांची दुसरी यादी अडलेलीच!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : जळगावच्या भाजपा खासदार उन्मेश पाटलांना शिवसेनेत घेऊन उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची दुसरी यादी देखील जाहीर करून टाकली. या निमित्ताने त्यांनी शिवसेनेचा महाविकास आघाडीतला 22 जागांचा कोटा देखील पूर्ण केला. पण शरद पवारांना मात्र आपली 5 उमेदवारांची दुसरी यादी अद्याप जाहीर करता आलेली नाही. पवारांच्या राष्ट्रवादीला महाविकास आघाडीत फक्त 10 जागा लढवण्याची संधी मित्र पक्षांनी दिली, पण त्यातले फक्त 5 उमेदवार पवार जाहीर करू शकले. उरलेले 5 उमेदवार पवार अद्याप जाहीरही करू शकलेले नाहीत. सातारा आणि माढा या दोन मतदारसंघांमध्ये तिढे सोडविण्यात त्यांना अद्याप यश आलेले नाही. Thackeray’s second list by taking Unmesh Patal to Shiv Sena

जळगावचे बंडखोर भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी मातोश्री वर जाऊन आज शिवसेनेत प्रवेश केला. भाजपने त्यांचे तिकीट कापल्यानंतर ते अस्वस्थ होते. भाजपने त्यांच्या ऐवजी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे चिडून उमेश पाटलांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधले पण उन्मेश पाटलांनी “सेफ गेम” म्हणून आपल्या स्वतःकडे जळगावची लोकसभेची उमेदवारी न घेता आपले समर्थक करण पवार यांच्याकडे उमेदवारी सरकवली.

उद्धव ठाकरेंनी करण पवार यांच्याबरोबरच वैशाली दरेकर यांना कल्याण मधून, सत्यजित पाटील यांना हातकणंगले मधून, भारती कामडी यांना पालघर मधून उमेदवारी जाहीर केली. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची पहिली 17 उमेदवारांची यादी आधीच जाहीर केली. त्यानंतर आज उरलेल्या 5 उमेदवारांची यादी जाहीर करून त्यांनी आपला शिवसेनेचा 22 उमेदवारांचा महाराष्ट्रातला कोटा पूर्ण केला.

पण शरद पवारांना मात्र आपला फक्त 10 जागांचा राष्ट्रवादीचा कोटा पूर्ण करता आलेला नाही. शरद पवारांनी 5 मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले. उरलेल्या 5 लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करण्यात त्यांच्यासमोर मोठे राजकीय अडथळे आले. माढा आणि सातारा या 2 लोकसभा मतदारसंघांमधला तिढा पवारांना अजून तरी सोडवता आलेला नाही. साताऱ्यामध्ये त्यांचे विश्वासू खासदार श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारी स्वतःहून नाकारल्यानंतर तिथे पवारांकडे छत्रपती उदयनराजे यांच्यासमोर उभा राहू शकेल असा “तगडा” उमेदवार उपलब्ध नाही. त्यामुळे शशिकांत शिंदे किंवा सुनील माने किंवा बाळासाहेब पाटील यांच्यापैकी एकाची त्यांना निवड करावी लागणार आहे.

माढ्यामध्ये देखील मोहिते पाटलांची भाजपवर नाराजी असली तरी हातातले कमळ सोडून पवारांच्या पक्षाची तुतारी हातात घेण्याची राजकीय हिंमत मोहिते पाटील अद्याप दाखवू शकलेले नाहीत. त्यामुळे माढ्यातला एक टिळा पवारांना अद्याप सोडवता आलेला नाही. पवार “नवी खेळी” करणार, पवार “नवा डाव” टाकणार अशा बातम्या जरी माध्यमांमधून आल्या असल्या, तरी प्रत्यक्षात पवारांची “नवी खेळी” किंवा “नवा डाव” अजून तरी जमिनीवर दिसलेला नाही!!

Thackeray’s second list by taking Unmesh Patal to Shiv Sena

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात