वृत्तसंस्था
रायपूर : छत्तीसगडमध्ये, बस्तर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार कावासी लखमा आणि जगदलपूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करून पैसे वाटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून त्याचे फोटोही समोर आले आहे. त्याआधारे निवडणूक आयोगाने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.Case filed against Congress candidate in Chhattisgarh; Election Commission’s action on the allegation of distribution of money
वास्तविक, होलिका दहनाच्या दिवशी कावासी लखमा जगदलपूरला पोहोचले होते. यावेळी माँ दंतेश्वरी मंदिरासमोर होलिका दहनाचे आयोजन करणाऱ्या समितीने या कार्यक्रमासाठी लखमा यांच्याकडे देणगी मागितली होती. त्यानंतर लखमा यांनी स्वत: त्यांच्या हातांनी त्यांना पैसे दिले. शेजारी उभ्या असलेल्या काही लोकांनी त्याचे छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. भाजपनेही हा मुद्दा गाजवला.
हे प्रकरण निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले. त्यानंतर 25 मार्च रोजी सायंकाळी उशिरा जगदलपूर सिटी कोतवाली येथे कावासी लखमा आणि जिल्हाध्यक्ष सुशील मौर्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 123 आणि आयपीसीच्या कलम 171 बी, 171 सी, 171 ई आणि 188 अंतर्गत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, याप्रकरणी कावासी लखमांकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. कावासी लखमा कोंटा विधानसभा मतदारसंघातून 6 वेळा आमदार आहेत. 2023च्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला. आता पक्षाने त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. भाजपचे महेश कश्यप हेही उमेदवार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App