मोदींच्या कार्याला कमी लेखता येणार नाही, पण…; काँग्रेसच्या उमेदवारीनंतर शाहू महाराजांचे वक्तव्य

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 वर्षे सत्तेवर आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याला कमी लेखता येणार नाही. त्यांनी विकास कामे केलीत हे मान्य करावेच लागेल, पण तरी देखील देशात परिवर्तन झाले पाहिजे, या भूमिकेतूनच मी लोकसभेच्या मैदानात उतरलो आहे, अशा शब्दांमध्ये कोल्हापूरचे काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. Shahu Maharaj’s statement after Congress nomination

महाविकास आघाडीतला घटक पक्ष काँग्रेसने शाहू महाराजांची कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

शाहू महाराज म्हणाले :

साधारण वर्षभरापूर्वी मी प्रत्यक्ष राजकारणात नव्हतो. पण मी कायम राजकीय मैदानाच्या वेशीवर उभा होतो. त्या दृष्टीकोनातूनच मी विचार करायचो. पण कोल्हापूरात सगळेजण आपापलं काम करत होते. वर्षभरापूर्वी मला राजकारणात येण्याची आवश्यकता वाटत नव्हती. पण कदाचित आता ती वेळ आली असेल म्हणून मी जनमताचा कौल मागत आहे.

मी स्वत:ला फार महत्त्व देऊ इच्छित नाही. पण वर्षभरापूर्वीचा माझा राजकारणात न उतरण्याचा माझा निर्णय मला बदलावा लागला. तेव्हा मला राजकारणात उतरण्याची आवश्यकता वाटत नव्हती. पण आता जनतेला वाटत असेल की, आपण एका स्तरावर आलो आहोत, जिथे माझी आवश्यकता आहे. हीच वेळ महाराजांनी लक्ष घालण्याची आहे, असे जनतेला वाटत असावे. त्यामुळे मी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्राला आणि कोल्हापूरला मोठा इतिहास आहे. हा इतिहास छत्रपती शिवरायांपासून सुरु होतो. त्यांनी केलेले कार्य, त्या काळात त्यांनी समाजाला दिलेली दिशा, अन्यायाविरोधात त्यांचा लढा आणि सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी केलेले काम, या सगळ्याचा आदर्श आपल्यासमोर आहे. आधुनिक काळात शाहू महाराजांनी समता आणि शिक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचे कार्य केले. तोच विचार कोल्हापूरच्या जनतेमध्ये रुजला आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचासरणीचा प्रभाव आहे. हाच विचार पुढे नेणार आहे. सगळ्या समाजाला पुढे घेऊन जाणे हे आपले कर्तव्य आहे.

नरेंद्र मोदी हे गेल्या 10 वर्षांपासून पंतप्रधान आहेत. त्यांनी केलेले काम कमी लेखता येणार नाही. त्यांचे काम मान्य करावेच लागेल. पण देशात परिवर्तन व्हायला पाहिजे.

पुरोगामी घटक एकट्याने लढले तर यशस्वी होणे कठीण आहे. त्यामुळे सर्व पुरोगामी पक्ष आणि घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे, असेही शाहू महाराज यांनी सांगितले.

Shahu Maharaj’s statement after Congress nomination

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात