वृत्तसंस्था
मुंबई : राहुल गांधींचे विचार परिवर्तन झालेले नाही पण महाराष्ट्रात काँग्रेसला होणारा वाढता विरोध पाहून सावरकरांचा अपमान करण्याची हिंमत राहुल गांधी शिवाजी पार्कवर करणार नाहीत, अशा शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना डिवचले.Rahul Gandhi no longer has the guts to insult Savarkar from Shivaji Park; Ranjit Savarkar got confused!!
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईत शिवाजी पार्कवर होत आहे. त्यानिमित्ताने विरोधकांच्या आघाडीचे मोठे नेते शिवाजी पार्कवर येत आहेत. त्यापूर्वी राहुल गांधींनी महाराष्ट्रात 3 दिवसांचा दौरा करून नाशिक पासून मुंबई पर्यंत ठिकठिकाणी सभा घेतल्या. परंतु, या सभांमध्ये त्यांनी “सावरकर” हा शब्द देखील उच्चारला नाही, मात्र राहुल गांधींच्या आधीच्या मुक्ताफळांवरून त्यांना आणि उद्धव ठाकरेंना सोशल मीडियावर जबरदस्त ट्रॉलिंगचा सामना करावा लागतो आहे.
आज दिवसभरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबईचे भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, शिवसेना शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा, भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ आदी नेत्यांनी सावरकर मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींना डिवचून घेतले. यातल्या प्रत्येकाने राहुल गांधींच्या सावरकरांच्या अपमानास्पद वक्तव्यांसाठी उद्धव ठाकरे यांना “जबाबदार” धरले.
#WATCH | Ranjit Savarkar, Grandson of Veer Savarkar says, " For his political gains, Rahul Gandhi has kept insulting Veer Savarkar, this is not a new thing…in 2019, at this same Savarkar memorial, Uddhav Thackeray had told that Rahul Gandhi must be beaten with shoes…today,… pic.twitter.com/CJ50JI6Pq9 — ANI (@ANI) March 17, 2024
#WATCH | Ranjit Savarkar, Grandson of Veer Savarkar says, " For his political gains, Rahul Gandhi has kept insulting Veer Savarkar, this is not a new thing…in 2019, at this same Savarkar memorial, Uddhav Thackeray had told that Rahul Gandhi must be beaten with shoes…today,… pic.twitter.com/CJ50JI6Pq9
— ANI (@ANI) March 17, 2024
पण त्या पलीकडे जाऊन सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी खुद्द राहुल गांधींनाही डिवचले. राहुल गांधींचे मतपरिवर्तन झालेले नाही. त्यांनी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केलाच आहे. पण 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी याच स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये येऊन राहुल गांधींना जोड्याने मारले पाहिजे, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड गदारोळही उठला होता. काँग्रेसचा पाठिंबा दिवसेंदिवस घटत गेला. महाराष्ट्रातल्या लोकांनी काँग्रेसचा पूर्ण पराभव केला. काँग्रेसचा पाठिंबा घटल्याचे पाहून राहुल गांधी गेल्या काही दिवसांमध्ये सावरकरांचा अपमान करणारी वक्तव्ये करत नाहीत. याचा अर्थ त्यांचे मतपरिवर्तन झाले असा होत नाही, पण आज शिवाजी पार्कच्या सभेत देखील ते सावरकरांचा अपमान करण्याची हिंमत करणार नाहीत. कारण महाराष्ट्रातली जनता सावरकरांचा अपमान सहन करणार नाही हे त्यांना माहिती झाले आहे, इतकेच नाही तर जनता आपल्याला धडा शिकवायलाही कमी करणार नाही, याची भीती राहुल गांधींना वाटत आहे, अशा शब्दांमध्ये रणजीत सावरकरांनी राहुल गांधींना डिवचले.
त्याचवेळी रणजीत सावरकरांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मणिशंकर अय्यर यांची देखील आठवण सांगितली. मणिशंकर अय्यर यांनीच अंदमानातल्या स्वातंत्र्य ज्योती वरच्या सावरकरांच्या काव्यपंक्ती हटवल्या होत्या. त्यावर संतापून बाळासाहेबांनी मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारण्याचे आंदोलन शिवाजी पार्कवर केले होते. बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत मणिशंकर अय्यर यांची मुंबईत येण्याची हिंमत झाली नव्हती, अशी आठवण रणजीत सावरकरांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना करवून दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App